ताज्या घडामोडी

कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेचे धडाडीचे माजी अध्यक्ष विलास पवार यांचे दुःखद निधन

Spread the love

जाकादेवी/वार्ताहर
रत्नागिरी तालुका कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष, धडाडीचे-उपक्रमशील शिक्षक विलास महादेव पवार यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी अल्पशा आजाराने १२ जानेवारी रोजी आकस्मिक निधन झाले.
विलास पवार यांनी एम. ए .बी. एड पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते पदवीधर शिक्षक म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत होते. शिक्षक म्हणून त्यांनी ३० वर्ष अध्यापन केले. दोन महिने ते आजारी होते. उपचारादरम्यान कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांचे दुःखद ‌निधन झाले.
मालगुंड गावचे ते सुपुत्र होय.हरहुन्नरी, अभ्यासू,दिलदार,कणखर , मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून विलास पवार सर हे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात ओळखले जात. कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी संघटनेचे उल्लेखनीय कार्य केले. शिक्षकांच्या पाठीशी संघटनेची मजबूत फळी निर्माण केली. बौद्धजन पंचायत समिती मालगुंड शाखेत विकासकामांसाठी ते अग्रेसर असत.संघटनेला मार्गदर्शन करत. त्यांनी धार्मिक व सामाजिक कामकाजात आपले मोठे योगदान दिले होते.अतिशय शांत, आणि जिद्द स्वभावाचे व्यक्तिमत्व हरपल्याने सर्वस्तरातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
दिवंगत विलास महादेव पवार त्यांच्या अंत्ययात्रेला शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, मित्रपरिवार, समाज बांधव,तसेच विविध क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. शैक्षणिक संस्था, विविध संघटनांच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांचा जलदान विधी रविवार दि.२२ जानेवारी रोजी रत्नागिरी करवांचीवाडी येथील त्यांच्या शांतीदूत या निवासस्थानी होणार आहे.दिवंगत विलास पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,भावजय, बहीण, पुतणे, पुतण्या,असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!