ताज्या घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला मंडळ इस्लामपूरच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त बोरगाव येथे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

अहिल्यादेवी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सविता डांगे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला मंडळ इस्लामपूर च्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त भव्य हळदीकुंकू
कार्यक्रमाचे आयोजन ग्राम सचिवालय हॉल बोरगाव, ता. वाळवा येथे दिनांक २२ जानेवारी २०२३ रविवार
वेळ दुपारी २:०० ते ५:०० या वेळेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला मंडळ इस्लामपूरचे वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मकर संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी सर्व सभासद व महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे.

कार्यक्रमांमध्ये विविध खेळांचा समावेश आहे.पैठणीचा खेळ ,लकी ड्रॉ ,स्पॉट गेम्स, विजेत्यांसाठी सोन्याची नथ, खन साडी ,विविध प्रकारची गिफ्ट, हळदी कुंकू वाण, दिले जाणार आहेत.वरील सर्व आकर्षक बक्षिसे खालील मान्यवर यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. डोंगरमल पोरवाल इस्लामपूर, महेश्वरी साडी सेंटर महादेवनगर इस्लामपूर, माऊली बजार इस्लामपूर, राजेंद्र वाटेगावकर नूतन ग्रामपंचायत सदस्य बोरगाव असा खूप छान सुंदर भरगच्च कार्यक्रम महिलांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला मंडळ यांनी आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा असे आवाहन महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सविता विश्वनाथ डांगे (वहिनी) यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!