ताज्या घडामोडी

खंडाळा इंग्लिश मिडीयम स्कूलचे शासकीय रेखाकला परीक्षेत यश

Spread the love

जाकादेवी वार्ताहर
ग्राम विकास मंडळ वाटद मिरवणे संचलित, खंडाळा इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परिक्षेत उत्तम कामगिरी केली आहे. शाळेतील सांची जाधव, अंजली खारोल, कौशल लाकडे, तनिष्का सुर्वे, आकांक्षा बारगुडे, अवधूत भोजे, ऋतुराज जाधव, अथर्व शितप, आर्यन शिरगावकर, निखिल सावंत, अंशिका घांची, हेतवी पटेल, परिघा जाधव, वैष्णवी पेडणेकर या विद्यार्थ्यानी उत्तम ग्रेड मिळवून यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना शिक्षिका सौ. ऐश्वर्या कणावजे मॅडम यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण कमिटी अध्यक्ष मा. श्री. बाळशेठ जोग, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. प्रकाश कारखानीस, मुख्याध्यापक श्री. आशिष वासावे, पर्यवेक्षक श्री. शरद पावसकर यांनी हार्दिक अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!