आरोग्य व शिक्षण

उद्योजक अनंता तलाजी गाडे यांचे निधन

Spread the love

लोणावळा : कुसगाव बुद्रूक येथील भजनसम्राट शशिकांत उर्फ अनंता तलाजी गाडे (पाटील ) (वय-५०) यांचे अकस्मिकपणे आज सकाळी अकराचे सुमारास सोमाटणेफाटा येथील उपचार सुरू असता खाजगी रूग्णलयात निधन झाले.

त्यांचे पश्चात पत्नी , एक भाऊ, दोन मुले , आई , आणि बहीण असा परिवार आहे. कै.गाडे यांचे पार्थिवावर कुसगाव बुद्रूक , भैरवनाथनगर स्मशानभूमित शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी घेरेवाडीतील उद्योजक व लोहगड विकास सोसायटीचे चेअरमन गणेश धानिवले यांनी श्रध्दांजली वाहिली. कै .अनंता गाडे हे भैरवनाथ भजनी मंडळात भजनगायक म्हणून व उद्योजक म्हणूनही परिचित होते. भैरवनाथ तरूण मंडळाचे कार्यकर्ते , उद्योजक दत्ताञेय तलाजी गाडे हे त्यांचे बंधू होत. माजी ग्रामपंचायत सदय्य व तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकरराव गाडे तसेच मृदूंगाचार्य काशिनाथ गाडे हे त्यांचे चुलत बंधू होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!