ताज्या घडामोडी

दलित महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मा.सुधाकर वायदंडे यांची एकमताने निवड

Spread the love

दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत प्रा.मधुकर वायदंडे सर यांच्या समरणार्थ सांगली येथील मराठा समाज सांस्कृतिक भवनामध्ये घेण्यात आलेल्या आदरांजली सभेवेळी मा.सुधाकर वायदंडे यांची महाराष्ट्रातून आलेल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने दलित महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
अध्यक्षस्थानी मा.आमदार राजीव आवळे साहेब होते.
सुरवातीला दिवंगत प्रा.वायदंडे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
सुधाकर वायदंडे हे बहुजन चळवळीतील आक्रमक व्यक्ती म्हणून परिचित आहेत.2005 सालापासून गेली 17 वर्षे ते दलित महासंघाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत. 2008 साली त्यांनी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष तर 2014 पासून त्यांनी दलित महासंघाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे.
अनेक अन्यायग्रस्त कुटुंबाना न्याय मिळवून देण्याबरोबर आदिवासी पारधी पुनर्वसनासाठी त्यांनी उल्लेखनीय काम करत आहेत.
पारधी समाजासाठी राहुटी आंदोलन,उघडा मोर्चा, झिंज्या उपड आंदोलन,ठिय्या आंदोलन तसेच अवैध्य धंद्यांविरोध आंदोलन,राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना,वीज बिलाबाबत महावितरणसमोर ठिय्या आंदोलन,महागाई विरोधी आंदोलन यासह त्यांची अनेक आंदोलने गाजलेली आहेत.
प्रा.मधुकर वायदंडे यांच्या विचाराने दलित महासंघ तळागाळापर्यंत पोहचवून समाजातील शेवटच्या घटकाबरोबर शोषित,पीडित,वंचित,अन्यायग्रस्त लोकांना आक्रमकपणे न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुधाकर वायदंडे यांनी शेवटी सांगितले.
यावेळी मा.आ.राजीव आवळे साहेब,मातंग समाजाचे जेष्ठ नेते प्रा.राम कांबळे सर,शर्वरीताई पवार,दलित मित्र अशोक पवार,धनेश शेट्टी,राज्य कार्याध्यक्ष सतीशदादा मोहिते,राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे,उत्तमदादा मोहिते,सनातन भोसले,बसवराज चव्हाण,अविनाश वाघमारे,सदाभाऊ चांदणे,सुहास कांबळे,दिनकर नांगरे,अर्जुन आदमाने, लखन वारे,महेश देवकुळे,कृपादान वायदंडे,राजू चव्हाण, ,जितेंद्र काळे,रोशना पवार,गुंडाबाई काळे निर्मला पवार,वैशाली पवार,राकेश काळे,गुलछडी काळे, इंद्रजित काळे,जहांगीर पवार,दिकल पवार यांच्यासह मोठया प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते आभार सतीशदादा मोहिते यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!