ताज्या घडामोडी

शिराळा जगप्रसिद्ध नागपंचमीचा प्रश्न मार्गी लावू – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – शिराळा जगप्रसिद्ध नागपंचमीला ऐतिहासिक महत्त्व आहे.केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्तिक प्रयत्नातून नागपंचमीचा प्रश्न मार्गी लावू. यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. त्याचबरोबर या विभागातील रस्ते व पूल असे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी दिली.
कोल्हापूर येथे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक सत्यजित देशमुख यांनी भेट घेतली. शिराळा मतदारसंघातील विविध प्रश्नाबाबत चर्चा केली व विकास कामाबाबत माहिती दिली. याबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले:- शिराळा जगप्रसिद्ध नागपंचमीला फार मोठे महत्त्व आहे. देशभरामधील व परदेशातील अनेक नागप्रेमी लोक या उत्सवाला भेटी देतात. परंतु नागपंचमी साजरी करण्यासाठी घालण्यात आलेले निर्बंध काढण्यासाठी राज्य सरकारच्या सहकार्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करू.तसेच या मतदारसंघातील सर्व प्रलंबित कामे मार्गी लावू.नव्याने रस्ते व पूल बांधकामासाठी निधी दिला जाईल. अशी ग्वाही त्यांनी दिली.
सत्यजित देशमुख म्हणाले :- शिराळा जगप्रसिद्ध नागपंचमी हा लोकांच्या जिव्हाळ्याचा व अस्मितेचा प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आपण प्रयत्न करावा. त्याचबरोबर पुणे – बेंगलोर महामार्गावरील येवलेवाडी फाटा,नेर्ले, वाघवाडी फाटा, येलूर फाटा येथे उड्डाणपूल उभारणे आवश्यक आहे. यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी. त्याचबरोबर पेठ नाका ते सांगली या रस्त्यासाठी भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल नितीनजी गडकरी यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!