महाराष्ट्र

टाटा तलाव भरून वाहण्यासाठी बाकी काही तास; लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने रिक्षा फिरवून हुडको सह्याद्रीनगरमधील नागरिकांना इशारा .

Spread the love

लोणावळा :टाटा तलाव शंभर टक्के भरून ओसंडून छत्तीस मो-या वाहण्यासाठी काही तास बाकी असल्यामुळे टाटाचे वरिष्ठ आधिकारी श्री.काळे व सहकारी यांनी तलावाच्या पायावर सहारा पुलावर जावून पाहणी केली.तसेच लोणावळ्यातील नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव उपनगराध्यक्षा संध्याताई खंडेलवाल यांचेसह नगरसेवक , नगरसेविका व मुख्याधिकारी यांचे आदेशानुसार पूर येणाऱ्या भागात इंद्रायणीनदी लगतच्या हुडको (सह्याद्रीनगर ) कैलासनगर , इंद्रायणीनगर भागातील रहिवासी यांना दोन दिवस सुरक्षित ठिकाणी किंवा नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून भांगरवाडीत संत ज्ञानेश्वर विद्यालयात व वलवण काॕलेज रहावयास जाण्यासाठीचे अवाहन करण्यात आले आहे.

टाटा तलावाकडे व भुशीडॕमकडे , कुणालाही लोणावळ्यातील शहर पोलिस सोडत नसल्याने परिसरात फक्त स्थानिक नागरिक व काही विक्रेता दिसून आले.सायंकाळी चारच्या सुमारास टाटाचे वरिष्ठ अधिकारी श्री .काळे यांनी चार पाच अधिकारी यांचेसह छत्तीस मो-या व तलावाची पाणीपातळी पाहून घेत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सोमनाथ जाधव व नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांचेबरोबर चर्चा करून नगरपरिषदेच्या वतीने आपत्कालीन कक्ष स्थापन केल्याबाबत माहिती घेतली. आज साडेचार पर्यत तीन फूट पाणी पातळी कमी असल्यामुळे राञभर पाऊस असाच पडल्यास सकाळीच तलावाच्या मो-या पलटी होतील ,असा अंदाज टाटाचे एका कर्मचारी यांनी वर्तवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!