ताज्या घडामोडी

ईगल फाउंडेशनचा भव्य वर्धापन दिन पुण्यात संपन्न आयुष्याच्या वाटेवर काव्यसंग्रह प्रकाशित महाराष्ट्रातील निवडक कर्तबगार व्यक्तींचा विशेष गौरव

Spread the love

ज्ञानेश्वर सभागृह एम.आय.टी युनिव्हर्सिटी कोथरूड पुणे येथे दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी  सकाळी दहा वाजता ईगल फाउंडेशन राष्ट्रीय गरुड झेप कार्यगौरव सोहळा थाटामाटा संपन्न झाला. ईगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय विलासराव कोळेकर व त्यांचे सहकारी यांनी अतिशय परिश्रम घेऊन उत्कृष्टरित्या हा कार्यक्रम पार पाडला..

श्री दादासाहेब ईदाते..⤴️

 

सौ.तृप्ती देसाई..⤴️

या कार्यक्रमांमध्ये काकासाहेब देशमुख लिखित आयुष्याच्या वाटेवर हा काव्यसंग्रह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. शिवाय महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना यामध्ये, ईगल फाउंडेशन मार्फत पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथजी कराड साहेब संस्थापक अध्यक्ष एमआयटी युनिव्हर्सिटी पुणे, यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी राष्ट्रीय अध्यक्ष, भटक्या विमुक्त जमाती आयोग व पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेले श्री दादा इदाते, प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. महेश थोरवे पाटील सदस्य सेंन्सार बोर्ड महाराष्ट्र राज्य, मा. विजय शिंदे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, प्रा. नितीन सावगावे डायरेक्टर स्टुडन्ट कौन्सिल अँड इंटरनॅशनल रिलेशनशिप सेल , मा. तृप्ती ताई देसाई संस्थापक भूमाता ब्रिगेड, सौ. शालन कोळेकर संपादिका ईगल न्यूज चॅनेल, प्रा. किरण जाधव संपादक दै पुणे वैभव, मा. दत्तात्रय मानुगडे- राष्ट्रीय उपाध्यक्ष,, अखिल भारतीय परिवर्तन साहित्य परिषद. सौ. संगीता शिंदे अध्यक्षा तेजस्विनी महिला विकास सामाजिक संस्था. इत्यादी मान्यवर या कार्यक्रमास हजर होते.

ईगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी ईगल फाउंडेशन मार्फत सेवाभावी वृतीने कार्य करणाऱ्या लोकांना बहुमोलचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या संस्थेची टीम अतिशय सुंदर असून कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक वर्षी ही संस्था पुरस्कार देऊन सन्मानीत करतात.पुरस्कार प्रेरणा देतात केलेल्या कामाची पावती व पुढील कार्यास शुभेच्छा. देण्याचं कार्य ही संस्था उत्कृष्ट पद्धतीने काम करते असे प्रतिपादन मा.दादा इदाते यांनी व्यक्त केले. तसेच अत्यंत सविस्तर व सुरेख पद्धतीने आपल्या जीवनातील खडतर वाटचालीचा आढावा घेतला. या संस्थेमार्फत शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे बंधू काकासाहेब देशमुख. यांनी लिहिलेल्या “आयुष्याच्या वाटेवर “काव्यसंग्रह चे प्रकाशन मोठ्या थाटात व दिमाखात संपन्न झाले. असा देखणा सोहळा मी प्रथमच पाहत होतो अक्षरशः डोळ्याचे पारने फिटले व नवीन लिहिण्याची उर्मी मनामध्ये आली. साहित्य कुठे फुल बाजारात विकत मिळत नाही. ते लिहावे लागते तेव्हाच बाजारात येते अशी भावस्पर्शी विचार दत्तात्रय मानुगडे यांनी मांडले.दिप्तीताई देसाई ,प्रा.नितीन सावगावे यांनी या सोहोळ्यास शुभेच्छा. यावेळी प्रास्ताविक व स्वागत विलासराव कोळेकर यांनी केले.काकासाहेब देशमुख यांनी पहाडी आवाजात एका कवितेचे गायन केले.
या कार्यक्रमासाठी दिपक पोतदार, अशोक शिंदे, संजय गायकवाड , प्रकाश वंजोळे, श्री सदावर्ते, श्री ढोक,शेखर सुर्यवंशी, राजेश जोष्टे, संजय नवले,किरण जाधव , सिकंदरसिंग दुधानी, बाबासाहेब राशिनकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.तर कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावरील होण्यासाठी डॉ.महेश थोरवे पाटील व त्यांच्या अनेक सहका-यांनी नेत्रदीपक नियोजन, संयोजन केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुढील निवडक, कर्तबगार व्यक्तींना सन्मानचिन्ह व मानपत्र देवून गौरविण्यात आले.श्री विराज विलास दळी – राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार,सौ.पंकजा सचिन कुडाळकर -राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार,श्री शंकर अंदानी – राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार, प्रा.डॉ.शांताराम चौधरी – राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार, श्री विजय शिंदे -राष्ट्रीय शौर्य सन्मान पुरस्कार, श्री मोहन बागमार -राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार,श्री रामचंद्र मायदेव – राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार,सौ.अंजली काळे -राष्ट्रीय उद्योगरत्न पुरस्कार, श्री क्रांतीकुमार पाटील -राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार, श्री प्रवीण काकडे-राष्ट्रीय जिवनगौरव पुरस्कार, डॉ.भिमराव कोळेकर-राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार,श्री कारभारी सिताराम देव्हारे – राज्यस्तरीय आदर्श पिता पुरस्कार,श्री सुर्यभान नवले – राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार,श्री बाळासाहेब सुभेदार-राज्यस्तरीय गरुडझेप पुरस्कार,अँड.नितीन दसवडकर- राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार, सौ.जयश्री दिपक मदने- राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार,अँड.अनिशा योगेश फणसळकर-राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार,श्री अमृत यादव – राज्यस्तरीय निर्भिड पत्रकार पुरस्कार,श्री सागर चव्हाण -राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार,अँड.निलेश यादव -राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार, श्री नितेश पाटील -राज्यस्तरीय गरुडझेप पुरस्कार, प्रा.डॉ.जयवंत इंगळे -राज्यस्तरीय गरूडझेप पुरस्कार,डॉ.अशोक घोणे -राज्यस्तरीय गरूडझेप पुरस्कार, श्री उत्तम तरकसे-राज्यस्तरीय गरुडझेप पुरस्काराने गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!