ताज्या घडामोडी

कराड येथे उद्या शिवसेना नेते मा. श्री. नितीन बानुगडे पाटील यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन-कुटुंबप्रमुख श्री. सुधीरभाऊ राऊत

Spread the love

सातारा जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात अग्रगन्यपणे कार्यरत असलेल्या सातारा येथील एस. आर. ग्रुप च्या वतीने उद्या गुरूवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठिक १०:०० वाजता कराड ता. कराड येथील हॉटेल फर्म रेसिडन्सी येथे शिवसेना नेते मा. श्री. नितीन बानुगडे पाटील यांच्या उपस्थितीत अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एस. आर. ग्रुपचे कुटुंब प्रमुख उद्योजक मा. श्री. सुधिरभाऊ राऊत यांनी दिली.

संपूर्ण सातारा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एस. आर. ग्रुप चा वर्धापणदिनाचे औचित्य साधुन गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात उतुंग कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा तसेच आदरनिय श्री. सुनिल ठोंबरे (काका) यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असुन या सर्व समारंभास प्रमुख पाहूणे म्हणून शिव सेना नेते, इतिहास आभ्यासक, जेष्ठ व्याख्याते मा. श्री. नितीन बानुगडे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते उपस्थित सर्वाचा सन्मानपूर्व सत्कार करण्यात येणार आहे. समारंभास मा. सौ. प्राजक्ता सुधीर राऊत, मा. आकर्षिका पाटील वरळी मुंबई, वेध फाउंडेशन मंबईचे अध्यक्ष मा. श्री. संकेत सावंत, मा. सौ. संद्या सुनिल ठोंबरे, मा. श्री. दत्तप्रसाद शिंदे, मा. मनिषाताई ठोंबरे, अनिल नलवडे मा. श्री. सलिम मुलाणी यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, आद्योगिक व राजकिय क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या नाविन्यपूर्ण उपक्रमास उपस्थित रहावे असे अवाहन एस. आर. ग्रुप साताराचे कुटुंब प्रमुख मा. श्री. सुधीरभाऊ राऊत यांनी केले आहे.

समारंभ यशस्वितेसाठी दत्तात्रय बोंद्रे, बबन दळवी, रविंद्र साळुंखे, रमेश थोरात, रफीक मोमीन, राजेंद्र भारती, तानाजी यादव, अनिल जाधव, मोहसिन शेख, सुनिल देशमुख, योगेश ठोके, जालिंदर यादव, संजय माळी, महादेव शेवाळे, संजय नलवडे, यशवंत वडकर, सचिन नाचनेकर, यशंवत माळी आदी जन प्रयत्नशिल आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!