ताज्या घडामोडी

मराठा सेवा संघ प्रणित डॉ.रखमाबाई राऊत आरोग्य कक्षाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब ठाकरे यांची निवड.

Spread the love

मराठा जनसंवाद दौरानिमित्त आरोग्य कक्षाचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

प्रतिनीधी- डॉ.सुनील ना.भावसार

नाशिक जिल्हा मराठा सेवा संघाचा जनसंवाद दौरा गंगापुर रोडवरील मविप्रच्या सी.एम.सी.एस.कॉलेज सभागृहात संपन्न झाला.मराठा सेवा संघ प्रणित डॉ.रखमाबाई राऊत आरोग्य कक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब ठाकरे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करत जिजाऊच्या वेशातील पल्लवी पाटील,तनुष्का ठाकरे व शिवरायांच्या वेशातील जय पाटील,उत्कर्ष ठाकरे यांनी जिजाऊ वंदना गायन केली.
यावेळी प्रमुख अतिथी मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,संचालक डॉ.प्रसाददादा सोनवणे,
ॲड.लक्ष्मणराव लांडगे,रमेश पिंगळे
माजी उपायुक्त नवलनाथ तांबे,अधीक्षक अभियंता इंजी.राजेश मोरे,जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे,इंजी.के.डी.पाटील,माजी उपवनसंरक्षक पी.एन.पाटील,
जिल्हाध्यक्ष राजेंद्र निंबाळते,कार्याध्यक्ष शेखर पाटील,उपाध्यक्ष बाळासाहेब ठाकरे,इंजी.नितिन पाटील,नितीन मगर,जिल्हा सचिव सुनील गायकवाड,
जिजाऊ ब्रिगेड विभागीय उपाध्यक्ष सुमन हिरे, वैशाली डुंबरे,
तालुकाध्यक्ष डाॅ.मेघना सोनवणे,कल्पना पाटील वंदना भदाणे,भाग्यश्री ठाकरे,संदीप फाऊंडेशनचे प्राचार्य प्रा.प्रशांत पाटील,जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय हळदे,बँक संचालक सुधीर पगार,उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष विशाल देसले,शहराध्यक्ष अमोल पाटील,डॉ.रखमाबाई राऊत आरोग्य कक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ठाकरे,ज्येष्ठ नागरिक कक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भदाणे,क्रीडा कक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक तांबे,
डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा ढगे, न्यायदान कक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. संजीवकुमार देवरे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ.स्वप्नील इंगळे,शहराध्यक्ष प्रफुल्ल गायकवाड,संघटक विक्रम गायधनी, भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष आदित्य मगर,कार्याध्यक्ष निनाद निंबाळते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष राजेंद्र निंबाळते यांनी जिल्ह्याचा आढावा सादर करत मराठा सेवा संघासह ३२ कक्षाच्या तालुका,जिल्हा पातळीवर निवड प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत आरोग्य कक्षाच्या सुविधा देण्यासाठी होतकरू तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन केले.
विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे यांनी जनसंवाद दौऱ्याचा हेतू स्पष्ट केला
आरोग्य पक्षाची माहिती दिली.
मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी मराठा सेवा संघाचे काम दिशादर्शक असल्याचे सांगितले.
जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा या ठिकाणी जिजाऊ सृष्टीवर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.पुरूषोत्तम खेडेकर साहेब यांच्या संकल्पनेतून नव्या पिढीतील गोरगरीब होतकरु मुलामुलींना स्पर्धा परीक्षा शिक्षणासाठी जिजाऊ ज्ञान मंदिराची व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असा महत्वाकांक्षी भव्य दिव्य मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल प्रकल्प होत आहे.या सामाजिक कार्यासाठी दानशूर मंडळींकडे
पोहचण्यासाठी राज्यभर जिजाऊ ज्ञानमंदिर रथयात्रा लवकरच काढणार असल्याचे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.अर्जुनराव तनपुरे यांनी केले.
यावेळी देशातील पहिल्या महिला डॉक्टर आरोग्य कक्षाचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.आरोग्य कक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. तर जिल्हा सचिवपदी अनिल भामरे,कार्याध्यक्षपदी राजेंद्र चव्हाण व बाजीराव सूर्यवंशी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.त्याचप्रमाणे बागलाण तालुकाध्यक्ष विलास पगार,मालेगाव तालुकाध्यक्ष अनिल धोंडगे,इगतपुरी तालुकाध्यक्ष संजय राव, सिन्नर तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव चव्हाणके, दिंडोरी तालुकाध्यक्ष योगेश देवरे,त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष संजय चव्हाण,नाशिक तालुकाध्यक्षपदी दत्ता देशमुख,कार्याध्यक्ष किशोर अहिरे,उपाध्यक्षपदी प्रवीण पाटील,देवळा तालुकाध्यक्षपदी उद्धव पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देत सन्मान करण्यात आला.
यावेळी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा”विशेष समाजभूषण पुरस्काराने” गौरव करण्यात आला.
देशाला आरोग्य सुविधांची मोठी गरज आहे.कोरोना काळात आरोग्य सुविधांची मोठी वानवा झाली होती. आरोग्य कक्षाच्या माध्यमातून आरोग्य सुविधा सर्वसामान्य नागरिकांना गावखेड्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे तसेच डॉक्टर रखमाबाई राऊत यांचा दुर्लक्षित इतिहास सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य कक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे मुळगाव नामपुर तालुका सटाणा आहे.राज्य सरकारी बँकेच्या संचालकपदी तसेच जिल्हा परिषद आरोग्य संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदावर ते सध्या कार्यरत आहेत.कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात त्यांचा मोठा हातखंडा असल्याने मोठा लोकसंग्रह त्यांनी तयार केला आहे.आरोग्य संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी
निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!