ताज्या घडामोडी

स्थनिक विकास निधीतून आमदार अनिल पाटील यांनी दिल्या दोन रूग्ण वहिन्या-केला लोकार्पन सोहळा

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधि एस् एम पाटील

शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार लक्षात घेता अंत्ययात्रेसाठी लागणारे दोन स्वर्ग रथ आमदार अनिल भाईदास पाटील यांनी उपलब्ध केले असून याचा लोकार्पण सोहळा आमदारांच्या हस्ते काल नगरपरिषदेत पार पडला.
आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या स्थानिक विकास आमदार निधी अंतर्गत 24 लक्ष निधीतून हे 2 स्वर्गरथ जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहेत.येथील नगरपरिषदेच्या प्रांगणात याचा लोकार्पण सोहळा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला,यावेळी आमदारांनी दोन्ही स्वर्गरथच्या चाव्या मुख्याधिकारी यांच्या स्वाधीन केल्या.याप्रसंगी जि.प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील, तिलोत्तमाताई पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, शिवसेना तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, शहरप्रमुख सुरज परदेशी, कार्याध्यक्ष विनोद कदम, प्रा.अशोक पवार, महिला तालुकाध्यक्ष मंदाकिनी भामरे, धरणगाव निरीक्षक आशा चावरीया, जिल्हा उपाध्यक्ष संजय भीला पाटील, नगरसेवक मनोज पाटील, नगरसेवक राजेश पाटील, संजय पाटील, यज्ञेश्वर बाविस्कर, नगरसेवक दीपक पाटील, नगरसेवक राजेंद्र यादव, नगरसेवक निशांत अग्रवाल, नगरसेवक श्याम पाटील, जयवंत पाटील, सुरेश पाटील, विजय जैन, रणजित पाटील, इम्रान खाटीक, आबीद मिस्तरी, रफिक मिस्तरी, मुशीर शेख, बाळू पाटील, राजेंद्र देशमुख, दिनेश कोठारी,भुषण भदाणे, सुनिल शिंपी, प्रवीण देशमुख, यतीन पवार, ललित बोरसे, सचिन वाघ, वसीम पठाण, भुरा पारधी, योगेश पाटील यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते.!

मृतदेहांची अहवेलना थांबणार,,,

सद्यस्थितीत अमळनेर शहरासाठी पलिकेकडे एकच शवाहिनी उपलब्ध असल्याने अनेकदा एका दिवशी आठ दहा अंत्ययात्रा असल्यास इतरांना वाहनाची वाट पाहत बसावे लागत होते यामुळे काहीवेळा मृतकांच्या नातलगांमध्ये किरकोळ वाद उद्भवून शवाहिनो चालकास त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते.प्रत्यक्षात गेल्या दोन चार वर्षात शहराचा विस्तार चारही बाजूला मोठ्या प्रमाणात वाढून लोकसंख्या देखील वाढल्याने दोन शववाहिनी उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी होत होती अखेर आमदार अनिल पाटील यांनी शहराची गरज ओळखून दोन स्वर्गरथ उपलब्ध केल्याने आता एका दिवशी कितीही अंत्ययात्रा असल्यातरी कुणालाही या शवाहिनीसाठी ताटकळत बसावे लागणार नाही,आणि मृतदेहांची अहवेलना देखील होणार नाही.आमदारांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!