आरोग्य व शिक्षण

शासन आपल्या दारी कार्यक्रमास कार्ला जिल्हा परिषद शाळेत सहा हजार लोकांचा प्रतिसाद

Spread the love

लोणावळा :  शासन आपल्या दारी कार्यक्रमास कार्ला जिल्हा परिषद शाळेत सहा हजार लोकांचा प्रतिसाद मिळाला. कोविड लसीकरण तीन दिवसात चारशे पंच्याहत्तर जणांनी करून घेतले. मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला.

जात दाखले -७४, नवीन रेशनिंग कार्ड -१४०, नाव लावणे -८००, मतदारनोंदणी २००, संजय गांधी योजना -६०, उत्पन्न दाखले-२००, आधारकार्ड -२५० ,कृषि बियाणे -३४ असे लाभार्थी आहेत. यावेळी मळवली सजा तलाठी मीरा बो-हाडे , पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे , शिवसेना तालुकाप्रमुख राजूभाऊ खांडभोर , उप तालुकाप्रमुख सुरेश गायकवाड , कार्लाच्या ग्रामपंचायत सदस्या सोनाली मोरे, वत्सला हुलावळे , सदस्य सचिन हुलावळे , सनी हुलावळे , कार्यकते अक्षय हुलावळे , विशाल भाऊसाहेब हुलावळे , मंगेश हुलावळे , आमोल इंगवले, विशाल हुलावळे , सचिन हुलावळे , कार्लाचे मंडल आधिकारी माणिक साबळे , तलाठी सुभाष धोञे, पोलिस पाटील संजय जाधव, वेहेरगाव च्या सरपंच आर्चनाताई संदिप देवकर , उद्योजक संदिप देवकर , माजी सरपंच सचिन येवले, कार्लाचे अंगणवाडी बीट १,व २ च्या पर्यवेक्षीका सौ.कुंभार तसेच सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या , कृषि सहाय्यक तसेच वरसोली ग्रामसेवक आप्पा भानवसे , औंढे खुर्द चे ग्रामसेवक आर एस जोशी , तसेच माजी सरपंच आर्जुन पाठारे , मळवली सजा लिपिक सुभाष साठे,श्रीकांत घाडगे, तसेच महा ईसेवा केंद्रातील आधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

.सूञसंचालन पञकार व कार्लाचे माजी सदस्य भाऊसाहेब हुलावळे यांनी केले. डोंगरगाव सरपंच सुनिल येवले यांचेतर्फे तसेच वेहेरगावच्या सरपंच आर्चनाताई देवकर यांचेतर्फे तसेच संयोजक शरद हुलावळे व शिवसेना तालुकाप्रमुख खांडभोर यांचेतर्फे तहसिलदार यांना व तलाठी , मंडल अधिकारी यांना श्री एकविरा देवीच्या प्रतिमा देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!