ताज्या घडामोडी

दिवाळी सणानिमित्त गड किल्ले प्रतिकृती निर्मितीची स्पर्धा मावळ मुळशी या दोन्ही तालुका पातळीवर संपन्न.

न्यू इंग्लिश स्कूल चांदखेडच्या पटांगणात बक्षीस समारंभात,लायन्स क्लबच्या क्रीडांगणावर तोरणा किल्ल्याच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक-

Spread the love

दिवाळी सणानिमित्त गड किल्ले प्रतिकृती निर्मितीची स्पर्धा मावळ मुळशी या दोन्ही तालुका पातळीवर संपन्न ; न्यू इंग्लिश स्कूल चांदखेडच्या पटांगणात बक्षीस समारंभात,लायन्स क्लबच्या क्रीडांगणावर तोरणा किल्ल्याच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक- 

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २३ नोव्हेंबर.

दिवाळी सणानिमित्त गड किल्ले प्रतिकृती निर्मितीची ही स्पर्धा मावळ मुळशी या दोन्ही तालुका पातळीवर भरविण्यात आली होती! या स्पर्धेत दोन्ही तालुके मिळून अत्यंत अभ्यासू अशा ५० स्पर्धकांनी भाग घेतला होता!- त्यात खास करून हिंजवडी चांदखेड तळेगाव या विभागातील इतिहास प्रेमी स्पर्धकांनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला होता! या स्पर्धेचे आयोजन सकल हिंदू समाजानी अतिशय योजनाबद्ध पद्धतीने केले होते.

स्पर्धेच्या सर्व निकषाला पात्र ठरलेल्या स्पर्धकांना एकूण तीन बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार होते! त्यात प्रथम क्रमांक- लायन्स क्लबच्या क्रीडांगणावर तोरणा किल्ल्याच्या प्रतिकृतीची निर्मिती करणाऱ्या चिरंजीव युवराज पारगे आणि त्याच्या टीमला देण्यात आले. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या युवराजच्या या टीमचे हे अकरावे वर्ष होते. या अकरा वर्षातील या टीमने जवळजवळ नऊ स्पर्धेत विविध क्रमांकाची बक्षीस पटकावली होती.

यावर्षी मात्र सर्वार्थाने तोरणा किल्ल्याच्या प्रतिकृतीची निर्मिती केल्याबद्दल युवराजच्या या टीमला प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यात आले. म्हणूनच या सर्व टीमचे सर्वत्र अभिनंदन आणि अभिष्टचिंतन केले जात आहे. लायन्स क्लब तळेगावचे अध्यक्ष डॉक्टर लायन अनिकेत काळोखे प्रकल्प अधिकारी लायन मनोहर दाभाडे उद्घघाटक प्राध्यापक प्रमोद बोराडेसर मुख्य पाहुणे लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी आणि सर्व लायन सदस्यांनी चिरंजीव युवराज पारगे आणि त्याच्या सर्व टीमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि अभिष्टचिंतन केलं.

न्यू इंग्लिश स्कूल चांदखेडच्या पटांगणात या अतिशय देखण्या बक्षीस समारंभात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या टीमला भेटवस्तू, शिवछत्रपतीची मूर्ती – सन्मान चिन्ह आणि प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!