अध्यात्मिकमावळसामाजिक

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज जन्मोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन.

Spread the love

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज जन्मोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन.Organized Harinam week on the occasion of the birth anniversary of village deity Shri Dolasnath Maharaj.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २३ नोव्हेंबर.

तळेगाव दाभाडेचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह दिनांक २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यत श्री डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये होणार आहे. यामध्ये पहाटे अभिषेक, महापूजा व काकड आरती सायंकाळी हरिपाठ, काळभैरवाष्टक, आरती, दीपमाळ प्रज्वलन, भजन कीर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात अनुक्रमे आमदार सुनील शेळके, विलास काळोखे, किशोर भेगडे, संदीप सावंत, निलेश दाभाडे, छबुराव दाभाडे, सुरेंद्र पानसरे, समीर ओसवाल, आदित्य खांडगे, बिजेंद्र किल्लावाला, अशोक भेगडे, ॲड सौरभ दाभाडे, निखिल भगत, गिरीश खेर, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, रणजीत काकडे यांचे हस्ते रोज महापूजा संपन्न होणार आहे.

तसेच अनुक्रमे रोज हभप जगन्नाथ महाराज म्हस्के, हभप यतिराज महाराज लोहर, हभप महावीर महाराज सूर्यवंशी, हभप बळशिराम महाराज मिंढे, हभप सतीश महाराज काळजे, हभप गणेश महाराज कार्ले, हभप ज्ञानेश महाराज फलके, हभप मधुसूदन महाराज शास्त्री यांची कीर्तनसेवा होणार आहे.

याच बरोबर रोज मान्यवरांकडून, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मोत्सवानंतर पालखीची ग्रामप्रदक्षिणा तसेच त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी श्रवणाचा लाभ घेण्याची विनंती संयोजकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!