ताज्या घडामोडी

अशोक जाधव यांच्या कुंचल्यातून पिंपळ पानावरती अवतरले शरद पवार…

Spread the love

राजकारण आणि समाजकरणाच्या माध्यमातून केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवर शरद पवार यांनी आपला ठसा उमटवला असून त्यांच्या रुपाने संपूर्ण महाराष्ट्रासह देशाने एक उत्तम साहित्य,कला, क्रीडाप्रेमी, आधुनिक नेता अनुभवला आहे. एवढेच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा आणि शैक्षणिक कार्याचा वारसा ते संस्थेचे अध्यक्ष म्हणून सक्षमपणे पुढे घेऊन जात आहेत.

या शिक्षण संस्थेतील शरद पवार यांची अध्यक्ष म्हणून ५० वर्षांची यशस्वी सुवर्णमहोत्सवी वाटचाल सुरू आहे. यानिमित्ताने या शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्सचे कलाशिक्षक, चिंचोली (ता. शिराळा) येथील चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी त्यांचे पिंपळाच्या नाजूक जाळीदार पानावरती अप्रतिम व्यक्तिचित्र साकारले होते. ते नुकतेच एका कार्यक्रमात भेट देत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ‘संसदरत्न’ खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या कलावंत शिक्षकास बारामतीला येण्याचे आपुलकीने निमंत्रण दिले.सिक्कीमचे माजी राज्यपाल, सातारचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी शरदचंद्र पवार, सुप्रियाताई सुळे आणि चित्रकार अशोक जाधव यांच्या भेटीचा योग जुळवून आणला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!