ताज्या घडामोडी

आये मी संसार करु कसा??____₹___ डॉ.डी.एस.काटे

Spread the love

आत्मनिर्भर भारत!,
५ ट्रिलियन डॉलरकडे वाटचाल करणारी अर्थव्यवस्था !!
मागील आर्थिक वर्षांमध्ये तब्बल २७.०७ लाख कोटीचा कर वसुली!!
त्याचबरोबर जगातील अन्नधान्य उत्पन्नात दोन नंबरचा देश !!*
*तरुणांची सर्वात जास्त संख्या असणारा देश!!*
*मागील आर्थिक वर्षात चारशे अब्ज डॉलर पेक्षा जास्त निर्यात करणारा देश..!!

*जगात विश्वगुरू चे स्वप्न उरी बाळगणारा देश..!!

*तो म्हणजे भारत..*

अनादिकालापासून भारतीय स्त्री सुसंस्कृत- संसारिक, त्याचबरोबर कुटुंबाचा वसा घेऊन कौटुंबिक संसारातील अर्थगाडा चालवणारी एक माता म्हणून तिची प्रतिमा आज पर्यंत जगामध्ये आहे ….

पण आज महागाईमुळे तिच्यावर ही वेळ आली आहे की तिलाही म्हणावं लागत आहे की
*आये मी संसार करू कसा*?
हो ,तिची ही आर्त हाक आहे !!

देशातील वाढलेल्या महागाईमुळे तिची संसारातील घडी बिघडली आहे ??

महागाईमुळे सद्यस्थितीमध्ये गरीब व सामान्यांची पूर्ण वाट लागली आहे …

मग आपल्या देशाचे मोठेपणाचे हे एकच स्वप्न व मोठेपणाचा चेहरा माता भगिनीस,
*मोठे घरचा पोकळ वासा ;आये मी संसार करू कसा*? असं
वाटत आहे..

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त वाढत आहे. स्वतःचे घर आणि कुटुंब त्याच्या गरजा व सेवा योग्य पद्धतीने जर पुरत गेल्या तर मनुष्य समाधानी जीवन जगतो.. उद्योग-व्यवसाय- कुटुंबा मध्ये मनुष्य मानसिकरित्या प्रसन्न राहतो.
पण घर खर्चामध्ये महागाईमुळे नाकीनऊ येत असताना बाहेरील उद्योग व्यवसायामध्ये त्यास काय उत्साह राहील हे आपण जाणून घ्या ??

होय मित्रांनो… म्हणजे
वस्तू व सेवांच्या सामान्य किंमत पातळी मध्ये विशिष्ट कालावधीमध्ये झालेली वाढ !!!
दुसऱ्या भाषेत सांगायचे ठरले तर पैशाचे मूल्य मागणीमुळे घटत जाते!!

वस्तू व सेवा यांना जास्त रक्कम मोजावी लागते.. यास
*महागाई ,चलन फुगवटा, किंमतवाढ ,भाववाढ, असेही संबोधले जाते*

अशा परिस्थिती नंतर अचानक मागणी व किमतीत वाढ होते ..
त्याच बरोबर भूकंप
पूर,आपत्ती, रोग राई असेही प्रसंग यास कारणीभूत ठरतात…

यावरून असे लक्षात येते की कोरोना काळामध्ये ठप्प झालेली मागणी व पुरवठा आता सर्वत्र बाजारपेठ उघडल्यानंतर अचानक मागणी व पुरवठ्यामधे मध्ये वाढ होत आहे …

त्याच बरोबर माणसाची जीवनशैली वेगवेगळ्या पद्धतीने बदलत आहे.. या सद्यस्थितीमध्ये जगभर महागाई निर्माण झालेली आहे …

हे जरी खरे असले तरी इतर देशांमध्ये ती आटोक्यात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत..
त्याच बरोबर व्याजदर, इंधन दर, ऊर्जा पुरवठा यामध्ये भरघोस सबसिडी देऊन व कर कमी करून इतर देशांनी त्याबद्दल दिलासा दिलेला आहे …

पण आपल्याकडे या उलट परिस्थिती आहे.
इंधन दरानं कधीच शंभरी पार केलेली आहे.
त्याच बरोबर गॅसच्या किमती हजाराच्या वर गेल्या आहेत.

मुख्य म्हणजे मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी इंधन व ऊर्जा हे दोन घटक महत्वाचे झाले आहे..

खुल्या जागतिक धोरणामुळे वाहतुक आणि दळणवळणा शिवाय प्रत्येकाला पर्याय नाही …
या सर्व घटकांचा विचार करता, आज देशामध्ये महागाईचा दर सात टक्के पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आणि हा दर देशाच्या विकासात एक मोठा अडसर ठरणार आहे … ही एक धोक्याची घंटा निश्चितच आहे असे वाटते..

मुख्य म्हणजे इंधनाचे भाव वाढले की वाहतूक खर्च वाढतो, त्याचबरोबर अन्नधान्य व इतर उत्पादित वस्तू यांचे सुद्धा भाव वाढत जातात..

महागाई रोखण्यास राजकोषीय उपाय आहेत…

असे उपाय अशा आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये महत्त्वाचे ठरत असतात.. शासनाने आकारलेल्या सर्व वस्तू व सेवाच्या किमती हे महत्त्वाचे घटक असून…
शासनाने वस्तू व सेवा कराचे योग्य निरीक्षण- वर्गीकरण करून ,कनिष्ठ मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीयांच्या वापरात असणाऱ्या वस्तू व सेवा याचे दर कमी करावे. सर्वसमावेशक कल्याणकारी आर्थिक कर व्यवस्था ही आज तरी आवश्यक आहे..

भारतीय नागरिकाच्या जीवनमूल्यांचा विचार करता वस्तू व सेवा सारख्या नवीन कर संकलनात जीवन मूल्य चेपली गेली आहेत.. त्यामुळे करांमध्ये कपात करायला हवी..
म्हणजेच नागरिकांना दिलासा मिळेल…

आज तरी इंधनावरील लावलेला कर कमी करणे योग्य वाटते..
इंधना मधून सरकारला मुबलक विनासायास कर प्राप्ती होत असल्यामुळे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून शासन त्याकडे पाहते…

त्यामुळे सहज रित्या यावरील कर वाढवण्याचा सरकारचा कल असतो..

अशा या अप्रत्यक्ष करांमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य व
गरीब वर्गांचे भयंकर नुकसान होते. कारण की अप्रत्यक्ष कर हा श्रीमंत व गरीब दोघांनाही सारखाच असतो.

त्या सेवा -सुविधा.. वस्तू घेणे व वापरणे ऐच्छिक असते…
पण आज तरी त्या सेवा सुविधा जीवनातील मुख्य घटक म्हणून आज स्थित झालेल्या आहेत.

याचा अर्थ असा आहे की *एक लिटर पेट्रोल अदानी-अंबानींनी घेतले तर त्यांच्यावरही तेवढाच कर लागतो आणि गरिबांनी घेतले तर त्यालाही सारखाच कर लागतो*..

म्हणजेच अप्रत्यक्ष कर ठरवताना गरीबाचा ही विचार होणे आवश्यक आहे..
श्रीमंताची ऐपत राहील पण गरिबाचे काय??

कार्ल मार्क्स यांनी म्हटले आहे की …
*उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे*.
आपल्या देशामध्ये मोठे उद्योगपतीं चे प्रस्थ वाढले आहे. त्याचबरोबर सर्व उत्पादन साधने त्यांनी स्थापित केलेल्या कंपन्यावर आधारित असल्याने सरकारचे ध्येयधोरणे सुद्धा अशा उद्योगपतीच्या व्यवसायास पोषक असल्याने अर्थ विषमता वाढत आहे,
पण ही अशीच परिस्थिती राहिल्यास वर्ग संघर्ष होऊ शकतो हे वरील सिद्धांताने सूचित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!