ताज्या घडामोडी

शिराळा उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान,आरोग्य,सुदृढ बालक अभियानास सुरुवात.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा येथील उप जिल्हा रुग्णालयात आज (ता. 9) आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार महारक्तदान, आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन व जागृत पालक, सद्ढ बालक अभियानाची सुरवात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाली. या प्रसंगी अधिक्षक डॉ. जुबेर मोमिन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, डॉ. अनिरुध्द काकडे, डॉ. योगिता माने, डॉ. विनायक धस, डॉ. अमित पाटील, डॉ. गायत्री यमगर, डॉ. शैलेश माने, अधिपरिचारीका सुनिता फाळके आदी उपस्थित होते. शिबिरास माने ॲर्थोपेडी, सत्रे-देशमुख अर्थोपेडीक, डॉ. सतीष गोसावी हॉस्पीटल यांचे सहकार्य लाभले. यावेळी नागरिकांची अभा कार्ड, गोल्डन कार्ड काढ्यात आली. एच.आय.व्ही. समुपदेशन करण्यात आले. स्त्रीरोग अस्थिरोग, कान, नाक, घसा, बालरोग, डोळे, क्षयरोग तज्ज्ञांकडून रुग्णांच्या तपासणी करण्यात आली. रक्ताच्या विविध तपासण्यात करण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!