आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

कोकणवासीयांना मदतीचा हात द्या : जनसेवा विकास समितीचे आवाहन

Spread the love

तळेगाव दाभाडे : कोकणासह राज्यातील अनेक भागात पूर आला आहे. या पुराचा सर्वाधिक फटका कोकणला बसला आहे. परिणामी अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी तळेगांव दाभाडे शहरातील नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी केले आहे.

जनसेवा थाळी, मराठा क्रांती चौक, तळेगाव स्टेशन येथे उद्या (रविवारी) दुपारी 3 वाजेपर्यंत नागरिकांनी शक्य असेल ती मदत जमा करावी. कपडे, ब्लॅंकेट, चादरी, पॅकिंग केलेले खाद्यपदार्थ, टूथ पेस्ट, पिण्याचे पाण्याच्या बाटल्या या स्वरूपात नागरिक मदत करू शकतात. नाशवंत पदार्थ व वस्तू टाळाव्यात. उद्या 3 वाजेपर्यंत जमा होणारी मदत दुपारी 4 वाजता कोकणकडे रवाना होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!