आरोग्य व शिक्षण

बजरंगदलाने केली आदिवासी बांधवांबरोबर दिवाळी साजरी

Spread the love

सोमवडी : बजरंग दल मावळ व फिटनेस क्लब 365 यांच्या वतीने नाणे मावळातील सोमवडी येथील कातकरी वस्तीवर आदिवासी बांधवांबरोबर  दीपावली साजरी करण्यात आली.

आपलेच काही वनवासी बांधव आपल्यापासून हाकेच्या अंतरावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहत आहेत.त्याची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने त्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.

 

बजरंग दलाच्या माध्यमातून गेल्या अठरा वर्षांपासून   कातकरी ठाकर आदिवासी बांधवां बरोबर दीपावली उत्सव साजरा केला जातो. याच अनुषंगाने सोमवडी येथील कातकरी बांधवान सोबत दीपावली साजरी करण्यात आली.

लहान मुलांना खाऊ, फटाके वाटप करण्यात आले. तसेच घरोघरी दिवाळीचे फराळ,  फटाके, रांगोळ्या, वाटप करून बांधवांबरोबर  गप्पागोष्टी करण्यात आल्या. लहान मुलांबरोबर फटाके वाजवण्यात आले.तसेच इथून पुढेही कातरी बांधावांबरोबर वेळोवेळी संपर्क ठेवून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याबाबत चर्चा झाली.

यावेळी स्वरा इंटरप्राईजेसचे मालक योगेश दळवी, बाळासाहेब खांडभोर, बजरंग दल विभाग संयोजक संदेश भेगङे, नाणे मावळ मंत्री रोहिदास ढाकोळ, बाळासाहेब खांडभोर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!