ताज्या घडामोडी

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर गुरुजनांचा आदर ठेवा- उद्योजक स्वानंद महाजन..

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर गुरुजनांचा आदर ठेवा फक्त शिक्षण घेऊन पदवीधर होण्यापेक्षा यशस्वी उद्योजक बना असे प्रतिपादन महाजन उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक श्री.स्वानंद महाजन यांनी केले.
ते हाय्यर एज्जूकेशन सोसायटीच्या आदर्श बालक मंदिरात आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री.रमेश हसबनीस हे होते.प्रारंभी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले.
श्री.स्वानंद महाजन म्हणाले,बालवयातच मनात खूप मोठे व्हायची स्वप्न बघा,स्वप्नांचा पाठलाग करताना मात्र पाय जमिनीवरच ठेवा. स्पर्धेच्या युगात सरस राहायचे असेल तर ध्येय ठरवून ते गाठण्याचा प्रयत्न करा. आईवडील, गुरुजनांचा कायम आदर ठेवा.या शाळेने मला खूप काय दिले आहे त्यामुळेच मी आज या कार्यक्रमाला आनंदाने आलो.
ते म्हणाले,तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा हे आपले पहिले व्यासपीठ आहे.इथूनच आपला खरा प्रवास सुरु होतो.त्यामुळे खूप अभ्यास करा मात्र शालेय क्रीडा स्पर्धेत ही सहभाग घ्या..शाळेच्या कोणत्याही अडचणीत मी कायम पुढे असेन.
संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश हसबनीस म्हणाले,आपला विध्यार्थी आपल्याला प्रमुख पाहुणा लाभला याचा आम्हाला खुप अभिमान वाटतो.विध्यार्थ्यांना आपलेसे वाटून अध्ययन करणारा शिक्षक खरा शिल्पकार असतो म्हणून त्यांचा आदर हा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गुरुमंत्र ठरेल.
प्रारंभी स्वागतगीत मकरंद जोशी व विध्यार्थ्यांनी सादर केले. प्रमुख पाहुण्यांनी ओळख व प्रास्ताविक मुख्याध्यापक महेश जाधव यांनी केले. यावेळी संचालक रघुनाथ बुकशेटे, धनंजय देशपांडे, शिवाजी भोसले,आनंदराव चव्हाण प्रसाद इनामदार,विजय ठकार, संजय साठे,किरण पाटील,प्रभाकर सुतार,सौ.सुखदा महाजन,सौ.शालवी महाजन,सौ.सुलभा गायकवाड, सौ.सरिता पाटील,सौ.राणी ठकार-जोशी,सौ.जान्हवी जोशी ,यांच्या सहित पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रभाकर सुतार यांनी केले तर आभार विजय ठकार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!