ताज्या घडामोडी

आखिल भारतीय वडार महासंघाच्या वतीने कराड तालुका उपाध्यक्ष पदी सौ. निलम इंद्रजित माने यांची निवड

Spread the love

नेर्ले (ता. वाळवा ).

सविस्तर असे कि, आखिल भारतीय वडार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा . कमलाकर वडार साहेब व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. शिवाजी रामचंद्र भोसले यांच्या हस्ते शाखा उद्घाटन कार्वे नाका येथेकरण्यात आले. यावेळी कराड तालुका उपाध्यक्ष पदी, सौ निलम इंद्रजित माने यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी सातारा जिल्हा अध्यक्ष बाजीराव शिंगाडे(नाना), तसेच कराड तालुक्याचे अध्यक्ष आनंदराव भोसले (नाना),तसेच इतर कार्यकर्ते अक्षय परदेशी, अक्षय शिंदे, शशिकांत नलावडे, उषा वसव , संगिता शिंदे, काशिनाथ शिंदे, विजय पवार, विशाल शिंगाडे, विजय शिंगाडे, यांचा ही निवड पत्र देऊन सत्कार करण्यात आला. पुढे संस्थापक अध्यक्ष कमलाकर वडार साहेब म्हणाले, आखिल भारतीय वडार महासंघ हि एक सामाजिक संघटना असून हि संघटना सामाजिक कामाचा वारसा जपण्यात जास्त अग्रेसर आहे. तसेच हि संघटना गोरगरिबांची कामे करण्यासाठी व त्यांच्या वर होणाऱ्या अन्यायाला न्याय देण्यासाठी हि संघटना सज्ज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!