ताज्या घडामोडी

प्रा. दत्तात्रय साखरे यांना राज्यशास्त्र विषयात पीएच. डी. पदवी मिळाल्याबद्ल सत्कार

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. २८ (प्रतिनिधी)

उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. दत्तात्रय साखरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या मानवविद्याशाखे अंतर्गत राज्यशास्त्र विषयात पीएच. डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सोमवारी (ता.२७) रोजी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. त्यांनी ‘ आर. आर. पाटील यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय विकासातील योगदान ‘ या विषयावर मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र संशोधन केंद्राचे समन्वयक तथा संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. महेश मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला होता. या त्यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरणजी पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, डॉ. राजाराम निगडे, प्रा. डॉ. विनायक रासुरे, डॉ. सुजीत मटकरी, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, काकासाहेब पाटील, अशोक कलशेट्टी, राजू ढगे, बाबासाहेब चव्हाण, मुनीर शेख, आनंद वाघमोडे, लालअहमद जेवळे, राजू कोळी, अमोल कटके, योगेश पांचाळ आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात प्रा. दत्तात्रय साखरे यांचा सत्कार करताना डॉ. अशोक सपाटे, डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. विनायक रासुरे, काकासाहेब पाटील, राजू ढगे, अशोक कलशेट्टी व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!