ताज्या घडामोडी

शहापुर ते पैठण पायी दिंडीचे अमळनेर येथे उत्साहात स्वागत

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

ह.भ प आदरणीय श्री भगवान महाराज शहापूरकर हे सालावादाप्रमाणे शहापूर ते पैठण पायी दिंडी नेत असतात याही वर्षी शहापूर ला विधिवत पुजा करून दिंडीचे प्रस्थान झाले अमळनेर मार्गे त्यांची पायी वारी पैठण येथे जात असताना अमळनेर येथे पटवारी कॉलनीत सडा रांगोळ्या टाकून वाद्याच्या गजरात श्री शिवाजीराव मोहन पाटील यांनी सहपरिवार पायी दिंडीचे स्वागत केले. ह भ प भगवान महाराज व विणेकरी नारदीय गादी यांचे पाद्यपूजन शिवाजीराव मोहन पाटील यांचेकडून सपत्निक करण्यात आले. नंतर सत्संगात भजन, गवळणी, भारुड असा कार्यक्रम करण्यात आला सर्व वारकऱ्यांना नाश्ता प्रसाद, सरबत सेवा देऊन माऊलीच्या नामस्मरणात जय जय राम कृष्ण हरी म्हणत पाय वारी पुढे कोळपिंपरी गावी मुक्कामी जाण्यासाठी निघाली रस्त्याने सडा रांगोळ्या टाकून दिंडीचे मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात येत होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!