ताज्या घडामोडी

जी एस एस एस प्रीमियर लीग २०२३ महाराष्ट्र सुपरस्टार विजेता व रायगड फायटर्स उपविजेता

Spread the love

मुंबई/राजेश चौकेकर: गवळी समाज सेवा संघ महाराष्ट्र (रजि) आयोजित GSSS प्रीमिअर लीग २०२३ पर्व -३ कांदिवली येथील कमला विहार स्पोर्ट्स क्लब समोरील क्रीडांगणावर उत्साहात आणि जल्लोषात सामने संपन्न झाले,प्रथम सर्व खेळाडूं,मान्यवर , प्रेक्षक, सर्व समाज बांधव आणि लहान थोरांचे स्वागत करण्यात आले. त्या नंतर हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि गवळ्यांचे आराध्य दैवत भगवंत श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले, तसेच मैदानावर जाऊन मैदानाचे पूजन करून श्रीफळ फोडून भक्तिमय वातावरणात राष्ट्रगीत गाऊन सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या संघमालकांना शुभेच्छा देण्यात आल्या, या प्रसंगी श्री सुनील कासार – रोहा पोलीस पाटील रायगड , संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल कोटकर आणि संघाचे पदाधिकारी, शाखा पदाधिकारी, समाज्यातील जेष्ठ मान्यवर, संघ मालक, खेळाडू, समाजबांधव यांच्या उपस्थित सामने सुरू करण्यात आले

तसेच ओपन नॅशनल चॅम्पियनशिप पुणे येथे झालेल्या कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता कु.स्वरूप रूपेश दिवेकर याचा त्याच्या वडिलांसह प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

यावर्षी या उपक्रमासाठी संघाच्या वतीने थीम ठेवण्यात आली होती. “खेळ खेळू समाजासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी, जोडू समाज बांधव समाजाच्या प्रगतीसाठी.”

या प्रीमिअर लीगसाठी महाराष्ट्रातून १५०+ खेळाडूंची नोंदणी करण्यात आली होती, त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातुन आलेल्या ८ संघ मालकांचेही स्वागत करण्यात आले.
इंक्रेडीबल वांझोळे , रत्नागिरी टायगर,आर्यन लवेश क्रिकेट क्लब श्रीवर्धन,रायगड टायगर, आराध्या ११ रोहा,आर के लायन पाली, ऑल मॉनस्टर्स संगमेश्वर ,महाराष्ट्र सुपरस्टार वरील आठ संघ सहभागी झाले होते वरील सर्व संघ मालकांचे स्वागत करण्यात आले.

या सहभागी ८ संघात चुरशीची लढत झाली,
प्रथम क्रमांक महाराष्ट्र सुपरस्टार या संघाने तर द्वितीय क्रमांक रायगड फायटर्स संघाने पटकावला, तर आदर्श संघ R.K. लायन पाली संघाने पटकावला.
सर्वच खेळाडू अगदी उत्साहाने व संयमाने खेळ खेळले. कोणत्याच खेळाडू ने वाद न घालता हा भव्यदिव्य असा कार्यक्रम अगदी शांत तसेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
प्रथम विजयी संघाला रोख रक्कम २०,००१ रोख रक्कम आणि आकर्षक चषक व द्वितीय संघास १५,००१ रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
• आदर्श कर्णधार – ईश्वर चाचे
• यंग इमर्जिंग प्लेअर – नकुल गवळी .
• इमर्जिंग प्लेअर – दिनेश कोटकर .
• मॅन ऑफ दी सिरिज – नितेश धुमाळ.
• उत्कृष्ट फलंदाज – चंद्रकांत लटके .
• उत्कृष्ट गोलंदाज – नितेश धुमाळ.
प्रत्येक सामन्याचे सामनावीर यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
लीग चे समालोचन सुदर्शन किन्होळकर व अनंत डाकरे यांनी केले तसेच संघटनेचे खजिनदार सम्राट दिवेकर,जी एस एस एस समन्वय तृशांत पवार,प्रकाश चाचे,जय खेडेकर,मनोज खेडेकर,राजेश गायकर,संतोष लाड,योगेश घाटवळ,दिपक वरणकर,संदेश दर्गे,सुजित खेडेकर,तेजस महागावकर, ईश्वर चाचे,जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत प्रीमियर लीग पार पडली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!