ताज्या घडामोडी

बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. ३ (प्रतिनिधी)

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त उमरगा तालुक्यातील मुरूम येथील शरण पाटील मित्र मंडळाच्या वतीने (ता.०४) शनिवारी पासून नगर परिषद मैदानात ” काका चषक ” भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शरण पाटील मित्र मंडळाच्या वतीने प्रथम पारितोषिक २,११,४४४ रुपये रोख रक्कम व काका चषक, द्वितीय पारितोषिक माजी नगराध्यक्ष रशीद शेख यांच्या वतीने १,११,४४४ रुपये व चषक तर तृतीय पारितोषिक ५१,४४४ रुपये व चषक तसेच इतर वैयक्तिक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तरी जास्तीत-जास्त संघांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!