महाराष्ट्र

वडगावातील विविध सामाजिक संस्था व लोकसहभागातून साता-यातील पूरग्रस्तांना मदत रवाना

Spread the love

वडगाव : येथील मोरया महिला प्रतिष्ठान, मोरया ढोल पथक, राष्ट्रीय भोईसमाज क्रांतीदल परिवार वडगाव मावळ यांच्यावतीने व लोकसहभागातून सामाजिक बांधिलकी जपत “मदत नव्हे कर्तव्य” या अंतर्गत साता-यातील पूरग्रस्तांसाना मदत रवाना करण्यात आली.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वडगाव शहरातील नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांनी केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मदतीचा हात देत तांदूळ, गहू, तेल, बिस्कीट बाॅक्स, पाणी बाॅटल, ब्लँकेट, जुने नवीन कपडे, टॉवेल, फरसाण , मॅगी नूडल्स बाॅक्स, बेसन पीठ इतर अत्यावश्यक असलेले साहित्य जमा केले.

पूरग्रस्तांसाठी गोळा झालेली मदत पुण्यातील भोई प्रतिष्ठान व एनडीआरएफ दलाची तुकडी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. आज पहाटे भोई प्रतिष्ठान पुणे यांच्या उपस्थितीत अन्नधान्याच्या गाड्या सातारा जिल्ह्यातील कोयनानगर येथील मीरगावकडे रवाना झाल्या.

यावेळी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे, मा सरपंच बापूसाहेब वाघवले, मा सरपंच अर्चनाताई भोकरे, भोई समाजाचे उपाध्यक्ष समीर दौंडे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चेतना ढोरे, उपाध्यक्षा अबोली ढोरे, वडगाव शहर युवक काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष यशवंत शिंदे आणि प्रतिष्ठानच्या संचालिका तसेच मित्र परिवार उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!