ताज्या घडामोडी

आमोदिनीचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

Spread the love

आमोदिनी फाउंडेशन.. ही कायमच वेगळी वाट चोखंदळणारी आनंदयात्री आहे. अशा या आपल्या आमोदिनीचा प्रथम वर्धापन दिन सर्व आमोदिनींनी खूप उत्साहाने आणि आपले वेगळेपण जपत साजरा केला.
दिनांक 11 जानेवारी हा आमोदिनीचा वर्धापन दिन असतो. त्यानिमित्ताने पारंपारिक रित्या तो साजरा न करता समाजोपयोगी कार्य करून व जनमानसात आनंद आणि प्रेरक भावना निर्माण करून साजरा झाला.
आमोदिनी फाउंडेशन ही संस्था लहान मुले आणि स्त्रियांकरता कार्यरत आहे. त्यामुळे त्याबाबतचा विचार पुढे नेऊन वर्धापन दिन साजरा करण्याचे ठरले. मोठा कार्यक्रम, पैसे खर्च करणे इत्यादी ना फाटा देऊन प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळून कार्यक्रम साजरा करण्याचे ठरले व त्याची पूर्तता ही केली गेली. संपूर्ण महिन्याचे अवधीत पाच वेगवेगळे व अत्यंत समायोजित असे कार्यक्रम घेतले गेले.
१. पहिला कार्यक्रम दिनांक 1 फेब्रुवारी रोजी वेगळ्या पद्धतीने राबवला गेला. महाराष्ट्रात प्रथमच असा उपक्रम की ज्यामध्ये महिला रिक्षा चालकांचा सत्कार पुणे येथे घेतला गेला .पुरुषांप्रमाणेच हा व्यवसाय स्वीकारून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रिक्षा चालवणाऱ्या महिलांचा सत्कार त्यांना साडी आणि मोमेंटो देऊन आणि त्यांना तृप्ततेची ढेकर देणारी स्वाद पूर्ण डिश देऊन हा सोहळा पार पडला. रिक्षा चालक महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. सदर कार्यक्रमास अध्यक्ष एडवोकेट अनिशा फणसळकर उपाध्यक्ष सौ. रश्मि जोशी तसेच एडवोकेट प्रज्ञा वैद्य हजर होत्या. सदर कार्यक्रम सौ. रश्मि जोशी यांनी स्पॉन्सर केला होता तसेच मोमेंटो तो प्रीती शिंगवी यांनी उपलब्ध करून दिले. आणि स्वादपूर्ण डिश एडवोकेट फणसळकर यांनी दिली.
२. दिनांक एक फेब्रुवारी रोजीच धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान संचलित मुलांचे अनाथ आश्रम हडपसर येथे आणखी एक कार्यक्रम सदिच्छा भेट देऊन संपन्न झाला. तेथील मुलांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. तसेच त्या प्रसंगी मुलांना ब्लॅंकेट चे वाटप श्री व सौ बागुल पदाधिकारी यांनी केले. एडवोकेट निलिमा चव्हाण पदाधिकारी यांनी खाऊचे वाटप केले. वरील सर्व कार्यक्रम मुलांमध्ये उत्साह आणणारा आणि त्यांना नवी दिशा देणार होता. मुलांनी खूप उत्साहाने कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
३. दिनांक 4 फेब्रुवारी रोजी श्री मुकबधिर विद्यालय वाघोली येथील शाळेला भेट देण्याचा कार्यक्रम खूप उत्साहात पार पडला. तेथील मुलांचे प्रश्न शिक्षकांचे देखील प्रश्न समजून घेतले गेले. भावी काळात अशा मूकबधिर मुलांना काही समस्या निर्माण झाल्यास अथवा त्यांना समुपदेशन गरजेचे वाटल्यास तशी व्यवस्था करणेचे आश्वासन आमोदिनींनी दिले. सदर कार्यक्रमास अध्यक्ष एडवोकेट फणसळकर तसेच एडवोकेट पियाली घोष आणि एडवोकेट प्रज्ञा वैद्य उपस्थित होत्या. यावेळी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. सदरील खाऊ श्रीयुत लोहकरे यांनी स्पॉन्सर केला होता.
४ दिनांक 14 फेब्रुवारी रोजी” आपल्यामधील नकारात्मकता कशी बाहेर काढावी” यावर आमोदिनी तर्फे ऑनलाइन वर्कशॉप आयोजित केला होता. त्यास अपार प्रतिसाद मिळाला. सदरील मार्गदर्शन समुपदेशक व सायकोथेरपीस्ट
एडवोकेट अनिशा फणसळकर यांनी केले. सर्व सहभागींना सर्टिफिकेट प्रदान करण्यात आली.
५ सर्व सभासद व पदाधिकारी यांनी आपापल्या भागामध्ये घरकाम करणाऱ्या स्त्रिया तसेच अन्य गरजूंना शॉल साडी व ड्रेस वाटप केले
आणि अशाप्रकारे अत्यंत वेगळेपणाने व सामाजिक भान जपत आणि राखत समाजोपयोगी कार्य करून आमोदिनी संस्थेने आपला वर्धापन दिन साजरा केला. त्या समाजातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींनी अनुमोदन दिले व मदत केली तसेच अभिष्टचिंतन केले.
आमोदिनीने केलेले कार्य निश्चितच स्पृहणीय आहे आणि समाज त्यातून नक्कीच मला बोध घेईल आणि प्रेरित होऊन मार्गक्रमण करेल ही आशा आहे. आमोदिनीचे भविष्यात काही नवीन उपक्रम होऊ घातल्या आहेत त्यास आपला आशीर्वाद असावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!