ताज्या घडामोडी

गोरक्षनाथ मंदिराजवळ पुलाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी : आमदार मानसिंगराव नाईक यांनी मतदार संघातील मोठ्या दळवणाच्या रस्त्यावरी आवश्यक ठिकाणची पूलांची कामे बहुतांशी कामे पूर्ण केली आहेत, असे प्रतिपादन राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंतराव पाटीलसाहेब यांनी केले.
शिराळा ते मांगले रस्त्यावर तोरणा नदीवर गोरक्षनाथ मंदिराजवळ २ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या पुलाचे उद्घाटन त्यांच्या हस्त फित कापून झाले. त्यावेळी ते बोलत होते. माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थितीत होते.
आमदार नाईक म्हणाले, गोरक्षनाथ मंदिराजवळून जाणाऱ्या मांगले रस्त्यावरील पूल पूर्वचा जूना व कमी उंचीचा होता. गेल्या पावसाळ्यात तोरणा नदीस मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे जून्या पूलाचा कांही भाग तुटला होता. अनेक दिवस पाणी व पूल तुटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. त्याचा नागरिकांना व वाहन चालकांना त्रास होत होता. शिराळा बायपास रस्ता किंवा प्राध्यापक कॉलनीच्या लांबच्या रस्त्याचा आधार घ्यावा लागत होता. महाआघाडी सरकारकडे या पूलासाठी पाठपुरावा करून दोन कोटी रुयांचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यातून उंच पूल भारण्यात आला आहे.
प्रारंभी माजी मंत्री, आमदार पाटील यांच्या हस्ते फित कापून पूलाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, प्रचितीचे अध्यक्ष राजेंद्रसिंग नाईक, तालुक्याचे माजी सभापती सम्राटसिंग नाईक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, ‘विश्वास’चे संचालक विश्वास कदम, सुरेश पाटील व यशवंत निकम, वारणा काराखान्याचे संचालक विजय पाटील, माजी जि. प. सदस्य महादेव कदम, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनिल कवठेकर, युवकचे शहर अध्यक्ष अमित गायकवाड, मजूर फेडरेशचे संचालक संजय जाधव, गजानन सोनटक्के, बंडा डांगे, बांधकाम विभागाचे पी. एस. कदम आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!