ताज्या घडामोडी

कंटेकूर शाळेत जल्लोश चिमुकल्यांचा गेट टुगेदरने अनेकांनी दिला जुन्या आठवणीला उजाळा

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. १४ (प्रतिनिधी)

कंटेकूर, ता.उमरगा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिवजंयती निमित्य सोमवारी (ता. १३) रोजी जल्लोश चिकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच विजया जमादार होत्या. यावेळी उदघाटक सपोनि डाॅ.रंगनाथ जगताप, माजी उपसभापती गोविंद पाटील, उपसरपंच कमलताई धुमाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरहरी धुमाळ, उपाध्यक्षा अनिता दासे, ग्राम विकास अधिकारी पुजा स्वामी, तंटा मुक्त समिती राम मुडगे, शिक्षण विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंके, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विलास कंटेकूरे, शिक्षक संघाचे विजय ओंवाडकर, उपमुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, केंद्रप्रमुख शिला मुदगडे, पोलीस पाटील लक्ष्मण पांचाळ, अभियंता रघुनाथ शिंदे, युवक काॅग्रेसचे श्रीहरी शिंदे, मुख्याध्यापक कमलाकर मोटे, नागनाथ येवते (बेळंब), नबीलाल शेख (केसरजवळगा), कल्लपा पाटील (आनंदनगर, मुरुम), विजय पाटील (चिंचोली भुयार), महानंदा चिलगर (आलुर) आदींची प्रमुख उपस्थिती होती. शाळेतून गेल्या ३५ वर्षात बाहेर पडून विविध क्षेत्रात असलेले सेवानिवृत्त, कार्यरत मुख्याध्यापक, शिक्षक काशिनाथ साठे (वय-९४, माकणी), रमेश माळगे (वय-७८, मुरुम), भिमराव गोडबोले (वय-७२, मुरुम), ज्ञानदेव खांडेकर (वय-५९, काक्रंबा), पांडुरंग पोकलवाड (औरंगाबाद), मंकावती कांबळे, रमेश सावंत, दत्तु शेवाळकर, उमेश बिराजदार, बिना पोतदार, तानाजी बिराजदार, नागेश स्वामी, संदिप सुकनाळे, धर्मन्ना खुळ सह ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्व. गुरुनाथ देशमाने गुरुजींच्या स्मरणार्थ विजयकुमार देशमाने यांनी २५ ग्रंथ विद्यार्थ्यांना भेट दिले. महेश बदोले, बालाजी भोसले, बाळासाहेब वाघमारे, पुष्पलता पांढरे आदींनी बालकलाकांराचे कौतुक केले. सादरीकरणात देशभक्ती, लोकगीत, भारुड, बालगीत, भक्तीगीत, रिमिक्स असे २९ गीते व १ बचतगट एकाकींका विद्यार्थ्यांनी सादर केली. यशस्वीतेसाठी शिक्षक गोविंद जाधव, लक्ष्मण येवते, विठ्ठल कुलकर्णी, शिवकुमार स्वामी, लक्ष्मीकांत पटणे, संध्या कलशेट्टी, बबिता निंबाळकर, अनिता स्वामी, रुक्मीण जमादार, दिंगबर दासे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!