ताज्या घडामोडी

महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त मा. सौ. शोभाताई होनमाने यांचा मा. डॉ. आण्णासाहेब डांगे यांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न

Spread the love

येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या संचालिका, कडेगांव पंचायत समितीच्या माजी सभापती मा. सौ. शोभाताई होनमाने रा. देवराष्ट्रे यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विकास या विभागाच्या वतीने जिल्हा स्तरांवरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहिर झाला आहे. या जाहिर झालेल्या सन्मानपूर्वक पुरस्काराबद्दल येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लि., इस्लामपूरच्या कार्यस्थळावर महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री, मा. डॉ. आण्णासाहेब डांगे यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व बुके देवून संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सूतगिरणीचे चेअरमन श्री. एम. एन कांबळे, व्हा. चेअरमन श्री. प्रकाश बिरजे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे, संचालक अनिल शेटके, विलास काळेबाग, सौ. शाकीदाबी शेख, सौ. मंगल पवार, दयानंद चव्हाण, अमोल चौधरी, संजय देवकुळे, रमेश वडे, शिवाजी जाधव, राजेंद्र लोंढे, मंगेश लवटे तसेच जनरल मॅनेजर विनोद देशमुख, फायनान्स मॅनेजर राजेंद्र मिरजे, लेबर ऑफीसर अदित्य यादव, प्रौडक्षण मॅनेजर सुर्यकांत देसाई, आनंदराव मिटारी, एच. आर. पाटील, उमेश गावडे, श्रीहरी कुंभार, जावेद पटाण, अमोल देशपांडे, अश्वीन जाधव, शशांक राऊत यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बजरंग कदम यांनी केले. स्वागत, प्रास्तावीक संचालक श्री. बाळासाहेब खैरे यांनी केले. संयोजन डी. एस. पाटील, अशोकराव बडदे, अभिजित बारपटे, विजय पाटील, विजय कवठेकर, सचिन सोळवंडे यांनी केले. आभार संचालक माणिकराव गोतपागर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!