ताज्या घडामोडी

विश्वास ‘ येत्या २३ – २४ गळीत हंगामात इथेनॉल,बायोगॅस,पोटॅश,पोटॅश गोळी खत निर्मिती करेल – विराज नाईक.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – सन 2023-24 च्या गळीत हंगामात इथेनॉल, बायोगॅस, पोटॉश व पोटॅश गोळी खत अशी चार उत्पादने विश्वास कारखाना निर्मिती करेल, असे प्रतिपादन कारखान्याचे संचालक, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केले.
आज कारखान्यात ७ लाख ४ हजार ७०० क्विंटल साखर पोत्यांचे पूजन व २०२२-२३ गळीत हंगाम सांगता समारंभ पार पडला. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर अध्यक्षस्थानी होते.
संचालक नाईक म्हणाले, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तसेच कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या कुषल मार्गदर्शनाखाली ‘विश्वास’ कारखान्याने सतत प्रगती साधली आहे. संचालक मंडळाच्या सहकार्याने सातत्याने नव नविन उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत. कार्यक्षेत्रातील शेतकरी, सभासद, कारखान्याचे कर्मचारी यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. काळानुरूप बदल व नव निर्मिती केल्यामुळे आज विश्वासचे नाव राज्यभरात चांगल्या चाललेल्या कारखान्यांमध्ये घेतले जाते. या हंगामात 5 लाख 68 हजार 326 मेट्रीक टन गाळप करून 7 लाख 4 हजार 400 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.
ते म्हणाले, पुढील गळीत हंगामात सध्याच्या गाळप क्षमतेत वाढ करून प्रतिदिनी ६ हजार मेट्रीक टन गाळप क्षमता करणार आहे. इथेनॉल, बायोगॅस, पोटॅश व पोटॅश गोळी खत अशी चार उत्पादने कारखाना निर्मिती करेल. त्यासाठी आवश्यक ते यंत्रणेत सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. या हंगामात निर्यात साखरेला चांगला दर मिळाला. त्यामुळे केंद्र सरकारने प्रत्येक कारखान्यास दिलेला निर्यात साखरेचा कोठा वाढवून द्यायला हवा होता. मात्र केंद्राने तो वाढवला नाही. 12 जानेवारीस 2023 वाकुर्डे बुद्रूक योजनेच्या भाग एक मधील तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन माजी जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या हस्ते झाले. ही कामे पूर्ण होताच शिराळा तालुक्यातील पाण्यापासून सदैव वंचित शेती क्षेत्राला पाणी मिळले. तेथेही ऊसाचे उत्पादन वाढेल व त्याचा फायदा कारखान्यास होईल.
उपाध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, साखर कारखान्यांना ऊसाच्या तोडणी यंत्रणेची मोठी कमतरता प्रत्येक हंगामात भासत आली आहे. यावर उपाय म्हणून स्थानिक तोडणी यंत्रणा निर्माण व्हायहा हव्यात. अलिकडील काळात शेती मध्ये यंत्रांचा वापर वाढला आहे. त्याप्रमाणे तोडणीसाठी केन हार्वेस्टर यंत्राचा वापरही आपण केला पाहिजे. शिवाय कार्यक्षेत्रात ऊसाची वाढ करून प्राधान्य क्रमाने ऊसाची तोड करण्याबाबत योग्य नियोजन केले पाहिजे. जेणेकरून आपल्याला आवश्यक ऊस कार्यक्षेत्रातून उपल्बध झाल्यास बाहेरून ऊस कमी प्रमाणात आणावा लागेल. अध्यक्ष, आमदार मानसिंगभाऊ नाईक यांनी नेहमी कारखाना प्रगतीत ठेवला आहे. त्यामुळे शिराळा व शाहूवाडीतील शेतकऱ्यांचा ऊसाला योग्य दर मिळत आहे. कारखान्यात सातत्याने नव नविन उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत.
प्रारंभी उपाध्यक्ष श्री. पाटील यांच्या हस्ते महापूजा व साखर पोती पूजन झाले. स्वागत व प्रात्साविक संचालक विजयराव नलवडे यांनी केले. मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी जास्तीत जास्त उस तोडणी, वाहतूक करणाऱ्या टोळी मालक व वाहतूक ठेकेदारांचा बक्षीस देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास संचालक सर्वश्री. मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमास संचालक सर्वश्री. दिनकरराव पाटील, सुरेश चव्हाण, विश्वास कदम, सुहास घोडे-पाटील, बिरुदेव आंबरे, सुकुमार पाटील, यशवंत दळवी, यशवंत निकम, बाळासाहेब पाटील, अजित पाटील, आनंदा पाटील, तुकाराम पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील तसेच कोंडीबा चौगुले, सचिव सचिन पाटील, कारखाना व्यवस्थापक दिपक पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख, कर्मचारी, सभासद उपस्थित होते. संचालक शिवाजी पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!