ताज्या घडामोडी
अपघातात पाय गेला…पत्रकार विजय कांबळे यांनी मिळवून दिले जयपूर फूट.
शिराळा प्रतिनिधी.
सागाव तालुका शिराळा येथील आकाश चोपडे वय 21 हा गेल्या सहा महिन्यापासून अंथरुणावरती खीळून होता. अपघातामध्ये उजवा मांडीतून पाय कापला गेला होता.त्याला सुद्धा इतर मुलासारखे क्रिकेटने खेळायचे होते पण नशिबाने त्याला साथ दिली नाही तो घरी झोपून जायचा.त्याने बरेच लोकांच्याकडे मागणी केली,पाय मिळवून देण्यासाठी,पण त्याला काही पाय मिळाला नाही.असंच त्याला एक सामाजिक कार्यकर्ता पत्रकार विजय कांबळे यांची भेट झाली.त्यांनी आकाश यास स्वतः गाडीवरून नेऊन त्यास कृत्रिम पाय मिळवून देण्याची जबाबदारी घेतली.आणि त्याला तो मिळवून दिला.आकाशच्या डोळ्यात पाणी आले.आता तो बाहेर जाऊ शकतो.फिरू शकतो,खेळू शकतो. त्याच्या नवीन जीवनास हार्दिक शुभेच्छा…