ताज्या घडामोडी

अन्यथा प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ‘पाल ठोक’ आंदोलन करणार – सुधाकर वायदंडे यांचा इशारा

Spread the love

वाळवा तालुक्यातील आदिवासी पारधी समाजाच्या पुनर्वसनाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा अन्यथा इस्लामपूर प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ‘पाल ठोक’आंदोलन करण्याचा इशारा दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन दलित महासंघाच्यावतीने सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार श्री. प्रदीप उबाळे यांना दिले.
सुधाकर वायदंडे म्हणाले,दलित महासंघाचे संस्थापक दिवंगत प्रा. मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आंदोलने,मोर्चाच्या माध्यमातून लढा सुरु आहे.त्यामुळे शासन स्तरावर पुनर्वसन करणेबाबत आदेश परीत झालेले आहेत.
अनेकवेळा जिल्हाधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय, पंचायत समिती समोर बेमुदत धरणे आंदोलनासह विविध आंदोलने झालेली आहेत जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यात पुनर्वसनाबाबत उपाययोजना होत असताना ज्या वाळवा तालुक्यातून पुनर्वनाचा लढा सुरु झाला त्याच तालुक्यात प्रशासनाची उदासीनता का ? पारधी समाजाचे पुनर्वसन न करता त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळावे अशी प्रशासनाची मानसिकता आहे का?यासाठी ठोस उपाययोजणांची गरज असताना प्रशासनाने मात्र प्रत्येक वेळी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे एक गाव एक पारधी कुटुंब या योजनेप्रमाणे वाळवा तालुक्यातील काही कुटुंबाना गावे मिळाली परंतु अजूनही घरकुलाचा प्रश्न सुटलेला नाही काही गावातून पुनर्वसनाला विरोध करून पारध्यांना हाकलण्याचे प्रकार सुरु आहेत तसेच काही कुटुंबे अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत याची दखल वाळवा तालुक्यातील प्रशासन घेत नाही याचा दलित महासंघाच्या वतीने आम्ही निषेध करतो.
प्रांतधिकारी यांनी दोन्ही तालुक्याचे तहसीलदार,गटविकास अधिकारी,संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक,तलाठी यांची पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी आढावा बैठक घेऊन लेखी आदेश करुन पारधी समाजाच्या संपूर्ण पुनर्वसनाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा व पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ‘पाल ठोक’ आंदोलन करण्याचा इशारा सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.
निवेदनावर सुधाकर वायदंडे,जि.संघटक दिनकर नांगरे,टारझन पवार,इंद्रजित काळे,राकेश काळे,पक्षा काळे,रोशना पवार,गुलछडी काळे,रचना काळे,एडग्या काळे,पप्या काळे यांच्या सह्या आहेत.सुधाकर मधुकर वायदंडे,प्रदेशाध्यक्ष दलित महासंघ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!