ताज्या घडामोडी

न भूतो न भविष्यती,अद्भुत, अद्वितीय, ऐतिहासिक कर्मचारी एकजुटीचा नमुना म्हणजे आजचा अमळनेर पेंशन मोर्चा…*

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

आज अमळनेर तालुका कर्मचारी संपाचा पाचवा दिवस होता. आज अमळनेर तालुका समन्वय समितीने काढलेल्या मोर्चाला अतिशय तुफान व ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. न भूतो न भविष्यती असा आजचा कर्मचारी मोर्चा निघाला व याचे सर्व श्रेय सहभागी सर्वच कर्मचारी अधिकारी बंधू भगिनी व सर्व कर्मचारी संघटना पदाधिकारी यांना जाते. कारण आपल्या सर्वांच्या पाठिंबा व सक्रिय सहभागाशिवाय आजचा *ऐतिहासिक मोर्चा* निघणे शक्य नव्हतं. सुमारे अडीच हजार कर्मचारी बंधू भगिनी यावेळी रणरणत्या उन्हात उपस्थित होते. *अमळनेरच्या इतिहासातील हा कर्मचारी एकजुटीचा आजपर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा निघाला.* आज संपाचा पाचवा दिवस होता, आणि पहिल्या दिवसापासून पाचव्या दिवसापर्यंत आपला कारवा वाढतच चाललाय. आपल्या रोजच मिळत असलेला खंबीर पाठिंबा व सक्रिय प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

*कर्मचारी शिस्तीचे दिसले दर्शन..
सुमारे एक किमीच्याही पुढे मार्च्याची रांग लांबली होती तरीही कुठलाही गोंधळ गडबड नव्हता मोर्चा अत्यंत स्वयंशिस्तीने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथून तहसील कार्यालय येथपर्यंत पोहचला. कर्मचाऱ्यांच्या मोर्च्याच्या या शिस्तीचे सामान्य नागरिकांकडून विशेष कौतुक झाले.

एवढ्या मोठ्या मोर्च्याला केवळ 30स्वयंसेवकांच्या मदतीने नियोजनपूर्वक मोर्चा यशस्वी करून दाखवला. याचे सर्व श्रेय फक्त स्वयंसेवक बंधू भगिनींचे आहे. तुमची मेहनत व अचूक नियोजनाशिवाय मोर्चा अशक्य होता. सर्व स्वयंसेवक बंधू भगिनींचे तालुका समन्वय समितीमार्फत विशेष अभिनंदन व आभार.

*अपंग बंधूंचे विशेष आभार..
मोर्च्यात अनेक अपंग कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. उन्हातानात आपण मोर्चात सहभागी होत संपकाऱ्यांना दिलेलं नैतिक पाठबळ आम्ही कधीही विसरू शकणार नाहीत,तसेच *श्री. गजानन चौधरी सर या अपंग कर्मचारी बंधूंनी स्वहस्त निर्मित पोस्टर्स द्वारे माहितीपर आधारित तथा व्यंगातून अतिशय उत्तम NPS धारकांच्या भावना मांडल्या त्याबद्दल या पेंशनधारक मोठ्या बंधुंचेही खूप खूप आभार.

*यांनी मांडली संपकरी कर्मचारी बंधुंची भूमिका
यावेळी अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व इतर स्वयंसेवी सामाजिक संस्था यांनी मोर्चा व संपाला पाठिंबा दिला. परंतु उन्हात लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून थोडक्यात दोन तीन जणांचीच भूमिका मोर्चेकरींसमोर मांडली गेली. यात संपूर्ण लढ्याची पार्श्वभूमी तथा पुढील दिशा अमळनेर तालुका सरकारी निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक तथा जुनी पेंशन संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष डॉ. कुणाल पवार यांनी मांडली, तसेच मा. जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी श्री. विजय पवार साहेब, अमळनेर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री. रावसाहेब मांगो पाटील, प्रताप कनिष्ठ महाविद्याल कर्मचारी संघटनेचे मा. दिनेश भलकार, पेंशन संघटनेच्या श्रीम. पाकिजा पिंजारी यांनीही सभेला संबोधित केले, तर सूत्रसंचालन समन्वय समितीचे श्री. संजय पाटील यांनी केले व आभार समन्वय समितीचे श्री. सुशील भदाणे यांनी मानले.

*तालुक्यातील सर्व विभागाच्या कर्मचारी संघटनांचे आभार…
आजचा मोर्चा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला तर तो निव्वळ सर्व विभागाच्या कर्मचारी संघटना व त्यांचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने. आपण सर्वांनीच वैयक्तिक ताकद लावली नसती तर एवढी ऐतिहासिक कर्मचारी एकजूट आज तालुक्याने पाहिलीच नसती. म्हणून सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनांचे मनःपूर्वक आभार.
आजच्या पाचव्या दिवसाअखेर राज्यावर संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. तसेच राज्य समन्वय समिती अजूनही पेंशन लागू होईपर्यंत संपावर ठाम आहे. म्हणून आपला संप असाच सुरु राहील. उद्या रविवार असला तरीही आपण ठरलेल्या वेळी सकाळी ठीक 10:00 वाजता महसूल कार्यालय अमळनेर येथे जमायचे आहे व सुट्टीच्या दिवशीही संप सुरु ठेवायचा आहे. *तसेच अजूनही जे कार्यालय, शाळा, आस्थापना सुरु असतील त्यांना पुन्हा एकदा सोमवार पासून संपात पूर्ण ताकदीने 100% उतरण्याची अमळनेर तालुका समन्वय समिती विनंती करीत आहे.*एकूण 17 प्रकारच्या विविध मागण्या यात आहेत त्यामुळे कोणतीही काळजी न करता व दडपण न घेता आपण संपात उतरावे ही सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती.राज्य सरकारी निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती ता. अमळनेर जि.जळगाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!