ताज्या घडामोडी

कोण हिंदू हृदय सम्राट

Spread the love

माजी जेष्ठ मंत्री मा.श्री.आण्णासाहेब डांगे

“आमचे मित्र केंद्रिय मंत्री मा. ना. नारायणराव राणेसाहेब यांचे चिरंजीव आमदार श्री. नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ” हिंदु हृदय सम्राट ” असा केला माननीय नारायणराव राणे यांचे पुत्र म्हणून त्यांच्या तोंडी हे शब्द शोभले नाहीत कारण मा. नारायणरावांचा तसा स्वभाव नाही. आणि देशभरात एखाद्या संघटनेचा एकच सम्राट असु शकतो, अनेकजन नाहीत. सम्राट हा किताब अतिऊच्च पदस्थाला दिला जातो, ज्यांना सम्राट म्हणायचे ती व्यक्ती ज्या मालीकेत काम करते त्या मालीकेत तिच्या वरच्या दर्जाचे पद असत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर परम आदरणिय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना हिंदु हृदय सम्राट म्हणून त्यांचा गौरवाने उल्लेख केला जात होता. ते शिवसेनेचे हिंदु हृदय सम्राट होते. त्यांचे वरती अन्य कोणी पदाधिकारी नव्हता त्यांचा शब्द हा शिवसेनेत अखेरचा मानला जायचा.

मला जेवढी माहिती आहे, त्यानुसार उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे घराणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार धारणेतून पुढे आलेले आहे. आजच्या घडीला संघ माध्यमातुन किंवा संघाच्या प्रेरणेने, आधाराने देशात व परदेशातही काम करणाऱ्या पन्नास – साठ संघटना निरनिराळ्या क्षेत्रात काम करत आहेत. त्यापैकी भारतीय जनता पार्टी हे एक संघटन आहे.

प्रत्येक संघटनांच्या शिर्षस्त प्रमुखाला “सम्राट” म्हटले आणि त्याचा वकुब तेवढा असेल तर ते शोभून दिसेल. नाहीतर कोणालाही “सम्राट” उठसूठ ही पदवी आपण लावत बसलो तर ते हास्यास्पद होईल. संघ प्रेरणेने मी वर उल्लेख केला आहे. एवढ्या सर्व संघटनांची रचना शिडी सारखी आहे. हे लक्षात घेवून भारतीय जनता पार्टीचा विचार केला तर अखिल भारतीय अध्यक्षांना हिंदू हृदय सम्राट एक वेळ म्हटले तर चालेल का याचा ही विचार गांभिर्याने करावा लागेल. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत सर्व संस्था, संघटना या ज्यांच्या अधिपत्याखाली चालतात त्या परम पुजनीय सर संघ चालकांनाच ही उपाधी शोभून दिसेल. बाकी सर्वजन ” संघ पेड की एक एक डाल है ! पर बैठे हुये गरूड जैसे है ! ” इसमे किसी को भी सम्राट माना जाता नही !

आमदार नितेश राणेंच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनीच इनकार करायला हवा होता. ! पण – – – –अशा आशयाचे प्रसिध्द पत्र महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा. श्री. आण्णासाहेब डांगे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!