ताज्या घडामोडी

कर्मचारी संघशक्तीचा संपाचा सहावा- दिवस अमळनेर* *सुटी असून गाजला पेंशन गीत, गाणे पोवाड्यांनी.. उत्साह कायम

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

आज कर्मचारी संपाचा सहावा दिवस होता. विशेषतः आज रविवारची सुट्टी होती मात्र तरीही संपाला सुट्टी नव्हती व जोश पण कमी नव्हता. आज अनेकांनी आपल्या लेखणीतून, संकल्पनेतून पारंपरिक अहिराणी गीत, गाणे, कविता याद्वारे पेंशनपर जागृती केली. सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. श्री. एस. डी. देशमुख सर व श्री. हिंमत भोई सर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. श्री. राजेंद्र वारुळे सर यांनी अहिराणी दामेंडा म्हणून भावना व्यक्त केल्या. तसेच श्री. ईश्वर महाजन सर यांनी कवयित्री सौ. सुनीताताई रत्नाकर पाटील यांनी लिहिलेली पेंशनवर आधारित कविता सादर करून दाखवली. तर महिला भगिनींच्या ग्रुपने देखील गीतं सादर करून आजचा दिवस पार पाडला. सर्व सहभागींचे तालुका समन्वय समितीमार्फत मनःपूर्वक आभार व धन्यवाद.
दुसरे अत्यंत महत्वाचे असे की उद्या सकाळी ठीक 10:00 वाजता *जुनी पेंशन मुद्द्यावर *राजपत्रीत अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक बोलवलेली आहे, तसेच वेगवेळ्या सूत्रांद्वारे व्हायरल बातम्यांद्वारे असेही कळून येतंय की दिनांक 28मार्च पासून संपावर जाणारे राजपत्रित अधिकारी कदाचित उद्यापासूनच संपावर जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. तरीही तसे न झाल्यास आपल्याला 28तारखेपर्यंत याच ताकदीने संप रेटून न्यायचा आहे. कुणीही घाबरून जाऊ नये, खचून जाऊ नये. आपले स्थानिक अधिकारी, पदाधिकारी देखील आपल्या सोबतच आहेत. अजूनही जे बंधू भगिनी संपात सहभागी नाहीत त्यांना आम्ही आर्त साद घालतोय उद्यापासून आपणही संपात सहभागी व्हावं आणि लढा आणखी बळकट करावा. आम्ही आपल्या प्रतिक्षेत आहोत…सोबत आजच्या दिवसाचे काही क्षणचित्रे..राज्य सरकारी निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती ता. अमळनेर जि.जळगाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!