महाराष्ट्र

नगरपरिषदेच्या लेखी अश्वासना नंतर बेमुदत कामबंद आंदोलन स्थगित

Spread the love

तळेगाव : नगर परिषदेच्या विद्युत विभाग, अग्निशमन विभाग, आस्थापना विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जनसेवा विकास समितीच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले होते.आंदोलनकर्त्यांना मुख्याधिकार्यानी चौकशी संदर्भातील लेखी पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

नगर परिषदेच्या विद्युत विभाग, अग्निशमन विभाग, आस्थापना विभागातील कर्मचार्यांना मासिक पगार वेळेवर मिळत नसून मिळणारा पगार नियमानुसार मिळत नसल्याने कंत्राटी कामगारांनी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांना सदर प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती.

जन सेवा विकास समिती गेल्या तीन महिन्यापासून कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे.
जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटी कामगारांना घेऊन नगर परिषद प्रशासनास मागण्या मान्य होई पर्यंत काम बंद ठेवण्या बाबत लेखी निवेदन दिले.

संध्याकाळी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बैठक आयोजित करून त्वरित एक महिन्याच्या पगार अदा केला. पगारातील फरकाबाबत समिती नेमून चौकशी करण्यात येईल व समितीच्या आदेशानुसार कंत्राटदार पगार देण्यास बांधील राहील असे लेखी हमी पत्र कंत्राटदारा कडून घेण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी यांनी सदर बैठकीत स्पष्ट केले.आंदोलन कर्त्यांना मुख्याधिकार्यानी चौकशी संदर्भातील लेखी पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

या प्रसंगी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे , नगर सेवक समीर खांडगे, संतोष शिंदे , निखिल भगत, गणेश काकडे, मिलिंद अच्युत, रोहित लांघे, कल्पेश भगत व सर्व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्का साठी वेळ आली तर आंदोलन करणार असल्याचे किशोर आवारे यांनी या वेळी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!