ताज्या घडामोडी

कांदिवली पश्चिम मध्ये ‘ मोहल्ला व शांतता कमिटीची’ बैठक संपन्न.

Spread the love

भारत कवितके मुंबई कांदिवली
मंगळवार दिनांक २१ मार्च २०२३रोजी सायंकाळी ६ वाजता कांदिवली पश्चिम मधील पोलीस ठाणेच्या हद्दीत भाजी मार्केट,गणेशनगर,श्रेया बिल्डींगच्या बाजूला,मोहल्ला व शांतता कमिटीची बैठक पार पडली.येणारे धार्मिक सण गुडी पाडवा,रमजान,श्रीराम नवमी,हनुमान जयंती,गुड फ्रायडे,महावीर जयंती,व भारत रत्न डा.बाबासाहेब आंबेडकर जयंती या अनुषंगाने सदर बैठकीचे आयोजन कमिटीच्या सदस्यानी केलेले होते. या प्रसंगी येथील स्थानिक नागरिकांच्या स्थानिक समस्याचे निरसन करण्यासाठी व येणाऱ्या सणाच्या पाश्र्वभूमी वर कायदा व सुव्यवस्था राखण्यासंबंधी नागरिकांना पोलीस आधिकारी वर्गाने विशेष सूचना देऊन पालन करण्यास सांगितले.यामध्ये वहातुक विषयीच्या समस्या, फेरीवाले विक्रेताची समस्या, गुन्हेगारीची समस्या, सायबर फसवणूक समस्या, या बाबतीत स्थानिक नागरिक व पोलीस अधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा घडून आली.स्थानिक नागरिकांनी सांगितलेल्या समस्या वर पोलीस अधिकारी योग्य ती कायदेशीर कारवाई करतील,त्यासाठी नागरिकांनी पोलीसांना योग्य सहकार्य करावयास सांगितले. याप्रसंगी उपस्थित पोलीस अधिकारी यांचे कमिटी मार्फत शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. या प्रसंगी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर जाधव,प्रकाश घाडगे,विजय ठक्कर,बाबासाहेब पाटील,सानप सर आदि पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तर दुबेजी,मुन्नाभाई, अझहर सिध्दीकी,भारत कवितके, सिराजभाई सह अनेक महिला व पुरुष स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!