ताज्या घडामोडी

नेहरू युवा केंद्र ठाणे यांच्या वतीने बांदोडकर महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा उत्सव कार्यक्रम संपन्न.

Spread the love

युवा कार्यक्रम व स्पोर्टस मंत्रालय भारत सरकार अंतर्गत जिल्हास्तरीय *युवा उत्सव* नेहरू युवा केंद्र ठाणे,विद्या प्रसारक मंडळाचे बांदोडकर विज्ञान(स्वायत्त)महाविद्यालय व महाराष्ट्र युवा संघ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या पतंजली सभागृहात मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.या युवा उत्सवात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चित्रकला,काव्य लेखन व वाचन,फोटोग्राफी,भाषण व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.राज्य पातळीवर निवड झालेल्या प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रकाश कुमार मनुरे राज्य निदेशक नेहरू युवा केंद्र संघटन मुंबई,राजू पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त अतिशीग्र प्रतिक्रिया दल ठाणे,अशोक देशमुख जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष ठाणे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोझेस कोलेट व निशांत रौतेला जिल्हा युवा अधिकारी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या युवा उत्सवाला विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.महेश बेडेकर,जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने,क्रीडा अधिकारी सौ.सुचिता ढमाले व एनएसएस समन्वयक डॉ.उज्वला गोखे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.युवा उत्सवातील विविध स्पर्धांसाठी कॅप्टन बिपीन धुमाळे,सेवानिवृत्त प्रा.प्रकाश माळी,प्रा.अनिल आठवले, प्रा.विनोद थोरात,सौ.देवयानी लढे,जयश्री कतुरे,प्रणव देसाई,अंजली मौर्या,गोपी भोसले,नेहा ससे,योगिता पडवेकर,निखिल गुंडे व अरविंद जैस्वार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.युवा उत्सव यशस्वी होण्यासाठी नेहरू युवा केंद्राचे कु.ज्योती रानी,सुनील गमरे,महाराष्ट्र युवा संघाचे अध्यक्ष अजीत कारभारी ,एनसीसी प्रमुख कॅप्टन बिपीन धुमाळे, सेवानिवृत्त प्रा.प्रकाश माळी,एनएसएस चे रोहीत राठोड,कौस्तुभ जाधव,आश्लेषा भोसले,सिद्धांत कदम,रितूसिंह,काजल झा व वृषाली यांनी विशेष मेहनत घेतली.या युवा उत्साहात बांदोडकर महाविद्यालयासह विविध महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!