ताज्या घडामोडी

कै. माधवराव (काका) पाटील यांची ९७ वी जयंती विविध ठिकाणी साजरी…..

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. ३० (प्रतिनिधी)

ग्रामीण भागातील गोरगरीब, होतकरु मुला-मुलींना शिक्षणाची सोय व्हावी या उद्येशाने शैक्षणिक संकुलन उभे करणारे, शेती उद्योगाला चालना देण्याकरिता विठ्ठलसाई साखर कारखान्याची उभारणी करणारे विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष कै. माधवराव (काका) पाटील यांची ९७ वी जयंती मुरुम शहरात विविध ठिकाणी गुरुवारी (ता. ३०) रोजी मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. प्रारंभी कै. माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील, प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव, धनराज मंगरुळे, रशिद शेख, प्रमोद कुलकर्णी, रफिक तांबोळी, राजू मुल्ला आदिंची प्रमुख उपस्थिती होती.           श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील कै. माधवराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील, प्रशांत पाटील, विठ्ठलसाईचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, उमरगा जनता बँकेचे व्हाईस चेअरमन अँड. व्ही. एस. आळंगे, कारखान्याचे संचालक माणिकराव राठोड, श्रमजीवी संस्थेचे संचालक मल्लीनाथ दंडगे, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, डॉ. सतिश शेळके, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथनी, माजी नगराध्यक्ष प्रदिप दिंडेगावे, रशिद शेख, शिवशंकर मठपती, शामसुंदर तोडकर, प्रमोद कुलकर्णी, उपप्राचार्य चंद्रकांत बिराजदार, महालिंगप्पा बाबशेट्टी, डॉ. शौकत पटेल आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी महाविद्यालयाच्या वतीने परिसरातील गरीब लोकांना अन्नदानाचे वाटप करण्यात आले. शहरातील कै. माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय, प्रतिभा निकेतन, मुरुम, कोथळी, भुसणी व नूतन विद्यालय, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना आदि ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली.
फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील पाटील महाविद्यालयात कै. माधवराव पाटील यांच्या जयंती प्रसंगी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना बसवराज पाटील, बापूराव पाटील, शरणजी पाटील, प्रशांत पाटील, व्यंकट जाधव, दिलीप भालेराव आदि.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!