महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री नितीनजी राऊत यांनी आंबील ओढा प्रकरणात उपसभापती विधानपरिषद डॉ.नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेट…

Spread the love

पुणे दि २९ : पुणे शहरातील आंबील ओढा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकरण मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यात महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्थानिकांवर होणार अन्याय थांबविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक घेऊन स्थानिकांचे होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी स्थगिती मिळविली होती.

यासंदर्भातच आज ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पुणे जिल्ह्याचा दौरा करून सदरील प्रकरणाची माहिती घेतली. त्याचदरम्यान त्यांनी डॉ.गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेऊन पुढील दिशा ठरविण्याबाबत चर्चा केली. याबाबत मुख्यमंत्री यांच्या समवेत लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन देखील दोन्ही नेत्यांनी उपस्थित स्थानिक माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी आणि अभय छाजेड यांनी दिले. यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी पवित्र वस्त्र आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे हे पुस्तक देऊन त्यांचा सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!