महाराष्ट्र

कोयत्याने वार करत सावत्र आईचा खून

Spread the love

तळेगाव: वडील सावत्र आईकडे जास्त राहात असल्याचा राग मनात धरून कोयत्याने वार करुन मुलाने सावत्र आईचा खून केल्याची घटना काल रात्री श्रीरंग हौसिंग सोसायटी तळेगाव येथे घडली.

रेखा जाधव (वय ३८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ऋषिकेश वाघमारे (वय १५ )राहणार श्रीहरी हाउसिंग सोसायटी यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने आपले वडील सावत्र आईकडे राहतात याचा राग मनात धरून कोयत्याने पाठीत वार करून सावत्र आईचा खून केला .आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ३०२, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव व पोलीस निरीक्षक गुन्हे शहाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दुर्गनाथ साळी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!