महाराष्ट्र

कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा ठराव विधानसभेत मंजूर

Spread the love

मुंबई : कैकाडी समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात ठराव मांडला.हा ठराव केंद्र सरकारकडे पाठववण्यात येणार आहे.विदर्भातील पाच जिल्ह्यात या समाजाचा समावेश अनुसूचित जातीत करण्यात आला आहे.तर उर्वरित महाराष्ट्रात हा समाज भटक्या विमुक्तामध्ये मोडतो त्यामुळे कैकाडी समाजाला एकाच प्रवर्गात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन धनंजय मुंडे यांनी केले.

मध्य प्रदेशात कैकाडी समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये आहे. राज्य पुर्नरचनेआधी विदर्भ हा मध्य प्रांताचा भाग होता.पुर्नरचनेनंतर विदर्भाच्या पाच जिह्यातील कैकाडी समाज अनुसूचित जातीत राहिला. मात्र, राज्याच्या अन्य भागात त्याचा समावेश विमुक्त “अ’ मध्ये झाला. ही विसंगती दूर करण्यासाठी २०१४ मध्ये बार्टी सर्वेक्षण करून कैकाडी समाजाचा समावेश अनुसूचित जातीत करण्याची शिफारस अहवालात केली होती. त्यानंतर २०१६ आणि २०१७ मध्ये कैकाडी समाजाबाबत क्षेत्रीय बंधन उठविण्याबाबत केंद्र सरकारला शिफारस करण्यात आली होती, याबाबत आघाडी सरकारच्याकाळात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु तो प्रस्ताव काही कारणांनी केंद्रीयमागासवर्ग आयोगाकडून नाकारण्यात आला होता.

त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन  प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत कैकाडीसमाजाची लोकसंख्या, त्यांचे प्रश्‍न, सामाजिक स्थिती याबाबतचा स्वतंत्र अहवाल तयार करण्यातआला . या अहवालात कैकाडी समाजाचे मागासलेपण ‘ब अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याची निकड अधोरेखित करण्यात आली आहे. राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून  महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी बार्टीच्या अहवालासह प्रस्तावातील अन्य त्रुटी दुर करून पावसाळी अधिवेशनात तो मांडण्यात आला व विधिमंडळाचा हा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर झाला असे सामाजिकन्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

या बैठकीत सामाजिक न्याय’विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे आमदार बशबंत माने, उपसचिव दिनेश डिंगळे, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धग्मज्योती गरजाभिये, कैकाडीसमाजाचे नेते लालासाहेब जाधव, हनुमंत माने, जयशंकर माने, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ जाधव आदी उपस्थित होते.

कैकाडी महासंघाच्या वतीने आतापर्यत अनेक मोर्चे,घरणे,आंदोलने ,निवेदने या प्रश्‍नांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केलेला आहे. याकामी अखिल भारतीय कैकाडीसमाज महासंघाचे संस्थापकअध्यक्ष संजय मेडे, मा.आमदार नं पवार, मा. रोहिदास जाधव, अमोलमाने, शरद माने, लक्षमण माने, कैलास जाधव,रमेश गावकवाड, रवी जाधव, बाळासाहेब जाधव,अण्णा सोमा पवार, सायबा पवार, बाळासाहेब माते, प्रा.बाळासाहेब माने, मानसिंग जाधव, दिगंबरजाधव, भारत जाधव, किसन जाधव, गोरख माने,’विनोद जाधव,जित कोरी, दिगंबर जाधव,संजय गावकवाड,गोविंदउडाडे,अशोक पवार धोंडीराम जाधव तसेच अखल भारतीय कैकाडी महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक प्रयत केले,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!