ताज्या घडामोडी

करंजवडे विकास सेवा सोसायटीमध्ये राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पै.शिवाजीराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील महालक्ष्मी सहकार पॅनेलने अपेक्षेप्रमाणे आपली सत्ता कायम

Spread the love

इस्लामपूर दि.२२ (प्रतिनिधी)
एकाच सभासदाने आपला अर्ज कायम ठेवल्याने निवडणूक लागल्याने करंजवडे विकास सेवा सोसायटीमध्ये राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पै.शिवाजीराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील महालक्ष्मी सहकार पॅनेलने अपेक्षेप्रमाणे आपली सत्ता कायम ठेवली आहे. नूतन संचालकांनी राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले. कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांनी नूतन संचालकांचे कारखाना कार्यस्थळावर स्वागत केले. पै.शिवाजीराव साळुंखे यांचे चिरंजीव,युवा नेते अमर साळुंखे,सलग ११ वेळा संचालक म्हणून प्रतिनिधित्व करणारे बाळासाहेब यशवंत पाटील,जेष्ठ नेते,राजारामबापू सहकारी बँकेचे माजी संचालक जगन्नाथ गुरव,तसेच सयाजी पाटील,दिपक देसाई, माणिक पाटील,दिनकर पाटील,तानाजी ऐडके, संजय कांबळे,डी.आर.पाटील,दिपक देसाई विश्वास पाटील,प्रताप पाटील यांना संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. सर्व संचालकांनी प्रथम स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले.
याप्रसंगी राम कांबळे,जयराम पाटील, विकास पाटील,प्रभाकर देसाई,पोपट पाटील, प्रमोद कदम,हणमंत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. राजारामनगर येथे स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन करताना करंजवडे सेवा सोसायटीचे नूतन संचालक. समवेत बाळासाहेब पाटील,पै.शिवाजीराव साळुंखे, अमर साळुंखे,बाळासाहेब यशवंत पाटील, जगन्नाथ गुरव व मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!