महाराष्ट्र

75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये उत्साहात साजरा

पर्यावरण संरक्षण आणि एकतेचा कोरोना जागृतीचा संदेश

Spread the love

वडगाव : डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यता दिवस कोरोना नियमाचे पालन करत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसह्याद्री महानाट्यचे संस्थापक अध्यक्ष अॅड.  विनय दाभाडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अॅड.  विनय दाभाडे यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण संरक्षणा बरोबरच कोरोना काळात काळजी घेण्याचा संदेश दिला. आपले अनुभव व्यक्त करून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष  संतोष खांडगे  यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या भाषणातून त्यांनी पर्यावरण समतोल राखण्यात बरोबर एकतेचा संदेश दिला. कोरोना नियमाचे पालन करण्याचे आव्हान केले. कोरोना महामारीवर मात करून पुन्हा देशात आनंदी आनंद नांदेल असा विश्वास व्यक्त केला व देश महासत्ता बनेल असा आशावाद व्यक्त केला.

तसेच या कार्यक्रमात श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष .संतोषजी खांडगे, उपाध्यक्ष .दादासाहेब उर्हे,कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, खनिजदार सुदाम दाभाडे, संचालक अॅड. श्रीराम कुबेर,  विलास काळोखे ,  सूर्यकांत ओसवाल, शालेय समिती उपाध्यक्षा जयश्रीजोशी, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी चे रोटरीयन्स प्रवीण भोसले ,  सुनील खोल्लम,  योगेश शिंदे,  सचिन कोळवणकर,  युवराज पोटे,  प्रवीण जाधव, शंकर हदिमनी,जयश्री घोजगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली. नयन बाळसराफ व शालेय शिक्षिका आयेशा सय्यद यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनय दाभाडे यांचा स्वागतपर सत्कार  डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या हस्ते करण्यात आला.  संतोषजी खांडगे  यांचा स्वागत पर सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका शमशाद शेख  यांच्या हस्ते करण्यात आला.रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी चे सचिव प्रवीण भोसले व अन्य उपस्थित रोटरीयन्स यांचा स्वागतपर सत्कार शाळेच्या पर्यवेक्षिका रेणू शर्मा  यांच्या हस्ते करण्यात आला.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी खांडगे  व प्रमुख पाहुणे अॅड.  विनय दाभाडे यांच्या हस्ते मिठाईचे वाटप करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!