आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

मावळात शनिवारी होणार भव्य बैलगाडा शर्यत

Spread the love

वडगाव : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्याने तब्बल आठ वर्षाच्या कालावधीनंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून मावळात शनिवार (1 जानेवारी ) रोजी बैलगाडा शर्यत रंगणार आहे.

नाणोली  गावच्या दत्त जयंती उत्सवात तब्बल आठ वर्षांनी शर्यत होणार आहे. या शर्यतीत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सशर्त परवानगी दिली आहे.

न्यायालयाने बैलगाडा शर्यती आयोजनास  सर्शत परवानगी दिल्यामुळे प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे .यामुळे मावळातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या शर्यतीस राज्यातीला बैलगाडा शौकीन व बैलगाडा मालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मावळचे निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे व तळेगाव एमआयडीसीचे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पांडे यांची नियुक्ती नियमांचे पालन योग्य पद्धतीने होते की नाही याची पाहणी करण्यासाठी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!