ताज्या घडामोडी

वरवडे येथे राजमाता जिजाऊ ते क्रांतीज्योती सावित्रीबाई सन्मान महाराष्ट्रातील लेकींचा ‘ हा उपकम

Spread the love

वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरचे वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे येथे महाराष्ट्र शासन आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत ‘राजमाता जिजाऊ ते क्रांतीज्योती सावित्रीबाई सन्मान महाराष्ट्रातील लेकींचा ‘ हा उपकम आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून परिसरातील कर्तुत्ववान यशस्वी महिला आणि कोरोना योद्धा व महिला शिक्षिका यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरचे वरवडे या संस्थेचे उपाध्यक्ष श्री विजय जोशी (बापू जोशी ) मुख्य कार्यकारी अधिकारी C.E .O . श्री विराग पारकर वरवडे ग्रामपंचायत सरपंच .
कोषाध्यक्ष श्री संदीप सुर्वे आणि संस्थेचे पदाधिकारी डॉ. राजेंद्र विचारे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि मार्गदर्शन केले . उपस्थित कर्तुत्ववान महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या ..
माजी पंचायत सामिती सभापती आणि विद्यमान पंचायत समिती सदस्या सौ मेघना पाष्टे मॅडम ‘खंडाळा PHC आरोग्य अधिकारी ‘डॉ. श्रुती कदम मॅडम ‘ व
डॉ. सोनल व्हटकर मॅडम ‘ मालगुंड PHC आरोग्य अधिकारी डॉ.मधुरा जाधव मॅडम ‘सौ अंजली पारकर श्रीम.लीना चव्हाण ‘ सौ .स्नेहल चव्हाण ‘ सौ सपना पवार ‘ श्रीम.तेजस्विनी पावसकर ‘ श्रीम.सायली महाडिक ‘ सौ वेदिका गुरव ‘सौ चंदा विचारे सौ नेहा विचारे . ‘ श्रीम.पूनम सिस्टर ‘श्रीम.सुगंधा विचारे ‘ संगिता पाटील. अंगणवाडी सेविका ‘आरोग्य सेविका आणि शिक्षिका यांचा सत्कार भेटवस्तू आणि पुष्प देऊन केला . डॉ. कदम मॅडम सौ .अंजली पारकर आणि पंचायत समिती सदस्या सौ मेघना पाष्टे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी महिला दिनाचे कार्यक्रम चारोळी ‘कविता भाषण आणि गीतगायन विद्यार्थ्यांनी सादर केले . कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मा .मुख्याध्यापक श्री गरुडसर आणि पर्यवेक्षक मा. श्री देशमुख सर यांनी प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले . सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लाभले . एन.एम एम.एस . शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी सावरी पावसकर ‘ इन्स्पायर अवार्ड प्राप्त सृष्टी पोवार आणि मुक्ता खानविलकर . विज्ञान प्रदर्शन यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षिस देऊन गौरविण्यात आले
श्री एस .एस .चव्हाणसर यांनी सुत्रसंचालन केले . भेटवस्तू आणि बक्षिस वितरण श्री .आर .एम . जाधव सर यां नी पुरस्कृत केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ कदम मॅडम यांनी आभार . प्रदर्शन केले अत्यंत उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!