महाराष्ट्रसामाजिक

मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव वाचून आश्चर्यचकित व्हाल. सुहास नाखरे.

Spread the love

मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव वाचून आश्चर्यचकित व्हाल. सुहास नाखरे.You will be surprised to read the name of the person who helped. Suhas Nakhre.

आवाज न्यूज : विशेष लेख, ८ ऑगष्ट.

मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव वाचून आश्चर्यचकित व्हाल
अहमदाबादच्या व्यापारधंद्याच्या भागातील स्टेट बँक त्यात अरूण त्रिवेदी कार्यरत होते . बँकेत साडेदहानंतर व्यापाऱ्यांचे मुनीम भरणा करण्यासाठी येत रोजचे येणे असल्याने एक दुसर्‍यांना ओळखत रामशंकर (ब्राह्मण) नावाचे एक मुनीम होते मीतभाषी एक दिवस रामशंकरजीनी अरूणभाईना विचारलेत की दोन मिनिट वेळ असेल तर थोड बोलायच होत त्यानंतर दोघ प्रतीक्षा कक्षेत सोफ्यावर बसले रामशंकरानी त्यांना विचारले की साहेब तुम्ही कधी पक्ष्यांना दाणे टाकलेत ? अरूणभाई नाही म्हणाले साहेब मी कित्येक वर्षापासून टाकतो आहे काही फायदा दिसत नव्हता पण सवय झालीय असं म्हणाना की व्यसनच जडले होते पण त्या मुक्या पाखरांनी आज मला निहाल करून दिले !

अरूणभाई म्हणाले समजलो नाही त्यानंतर रामशंकरांनी आपबिती सांगण्यास सुरुवात केली दोन मिनिटांचा तास कधी झाला समजलेच नाही रामशंकर गरीब होते एका पेढीत तीस वर्षापासून नोकरी करत होते पगार जेमतेम , कुटुंबात पती पत्नी व मुलगा मनन एका छोटेखानी घरात गुजराण चालू होती सर्व संतोषी जीव . मनन अभ्यासात हुशार बारावीत सायन्स घेतले , ट्युशन्स तर शक्य नव्हती शाळेत मुख्याध्यापकांनी फी माफ करून दिली एवढ्या अडचणीतही बारावीत चांगले टक्के मिळाले पण प्रत्येक ठीकाणी वेटींग लिस्ट फी साठी पैसे नाहीत , डोनेशन तर दूरची गोष्ट मननला आय.टीत प्रवेश हवा होता पण निराशाच त्यात एक आशेचा किरण चमकला बेंगळुरूत NITTE संस्थेत फार्म भरलेला तेथे प्रवेश मिळण्याची संधी मिळाली जी एक नामांकित संस्था आहे बातमी चांगलीच होती , पण रामशंकरसाठी चादरीकरता पाय लांब होते तरीही बापलेकानी बेंगलोरला जाण्याचे नक्की केले चिंता तर ही होती की फी तर राहीली बाजूला भाड्याचेसुध्दा पैसे नव्हते रामशंकरने शेठजींकडून ऊचल घेऊन टिकीट आरक्षित केले व बापलेक संस्थेत पोहचले . मननने एक फार्म भरला व त्याला एक ब्राऊचर मिळाले रामशंकरचे डोळे एका टर्मची व हाॅस्टेलची फी वाचूनच पांढरे झाले.

काऊंटर क्लार्क दोघांची घालमेल बघत होता त्याने मननला बोलवले आणि इंग्रजीत विचारले काही अडचण मनन म्हणाला नाही आम्ही मॅनेज करून फी भरायची शेवटची तारीख काय आहे ? ऊद्याची , क्लार्क म्हणाला मननला चक्कर आल्या सारखे झाले तो पित्याजवळ जाऊन बसला आणि रडू लागला क्लार्क जागेवरून ऊठून पाणी घेऊन मननजवळ आला त्याला पाणी दिले भाषेचे बंधन होते त्याने रामशंकरला कन्नड भाषेत काही सांगितले , रामशंकरला काय समझले माहीत नाही ते म्हणाले नो मनी क्लार्क मननजवळ बसला आणि काही सांगितलं मनन थोडा सावरला मग वडीलांना म्हणाला की हे भाऊ म्हणतात की संध्याकाळपर्यंत थांबायला म्हणताय ते आपल्याला एके ठिकाणी घेवून जातील मग आपलं नशिब !!!

असंही टिकीट दुसर्‍या दिवशीचे होते गुजराथी समाजाच्या धर्मशाळेत उतरले होते क्लार्कने एका स्वस्त पण स्वादिष्ट हॉटेलचा पत्ता लिहून दिला असेही दोघही भुकेले झालेच होते जेवण करून एका बागेत संध्याकाळपर्यंत टाईम पास करून सहा वाजता संस्थेत परत आले पाच मिनिटात क्लार्क त्याचे काम पूर्ण करून त्यांना घेऊन रिक्षाने बरेच अंतर पार करून मोठ्या बंगल्यासमोर रिक्षा ऊभी राहीली , भाडे झाले अडीचशे रुपये रामशंकरने खिशात हात टाकला पण क्लार्कने रीक्षाचालकाला कन्नड भाषेत काही सांगून बंगल्यात प्रवेश केला. तेथील वैभव पाहून डोळे दिपून गेले, त्याचबरोबर इंचा इंचामध्ये तेथे रहाणार्‍यांचे संस्कारीपणा दिसत होते.

तीघंही मोठ्या ड्रॉईंग रूममध्ये बसले थोड्या वेळेत एक वयस्कर व आपोआपच वंदन होईल अशी प्रतिभाशाली महिला त्यांच्या समोर येऊन बसली , क्लार्कने बापलेकांचा परीचय करून दिला मग त्या दोघात कन्नडमध्ये संभाषण झाले तेवढ्यात चहानास्ता आला त्यांना चहानास्ता घेण्यास सांगून ती महीला आतमध्ये गेली थोड्यावेळेत ते महान व्यक्तीमत्व हातात चेकबुक घेवून बाहेर आले . क्लार्कला काही विचारून चेक लिहीला क्लार्कने तोडक्यामोडक्या हिंदीत मननला सांगीतले की एक सिमीस्टरची व होस्टेलची फीची रक्कम मिळाली आहे मननला अत्यानंद झाला तो सरळ त्या देवीच्या पायात पडला वातावरण भारावून गेले बाहेर रिक्षा ऊभीच होती तीघे तिच्यात बसले मननने व्याकुळतेने विचारले की ह्या देवीसमान आजी कोण आहेत ? आणि त्यांनी आमच्यासाठी एवढी तसदी कां घेतली ऊत्तर ऐकून बापलेक तर स्तब्धच झाले त्या होत्या भारतीय क्रिकेट टीमचा एक जगतविख्यात नामांकित खेळाडू अनिल कुंबळेच्या मातोश्री !!!

क्लार्कला त्यांची महती माहीत होती म्हणून तो गरजू व योग्य विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे घेऊन जात असे. दान सुपात्री पडण्यास तो फक्त निमित्त होत असे तरी एक यक्षप्रश्न समोर होताच !!! दुसर्‍या सेमीस्टरचे काय पण आता सर दीया ऊखळीमे तर फुटनेसे क्या डरना ? ह्या ऊक्तीप्रमाणे जो होगा ओ देखा जाएगाचा विचार करून दुसर्‍या दिवशी प्रवेशाचे सोपस्कार पार पडले मननचे शिक्षण सुरु झाले एके दिवशी अचानक मननचा फोन आला की संस्थेत पालकदिन आहे तुम्हाला यावे लागेल आधीच घेतलेली ऊचल अजून फेडली गेली नव्हती तेव्हा नविनचा प्रश्नच नव्हता शेठजींनी सुध्दा तीस वर्षाच्या चाकरीचा विचार न करता ऐपत नसेल तर मुलाला इतक महागडं शिक्षण देऊच नये असा टोला दिला रामशंकर हा कडू घोट गिळून गेला आणि मित्राकडून ऊसनवारी केली पण रात्रीच मननचा फोन आला आणि रामशंकर सरळ ते पक्ष्यांना दाणे टाकायचे त्या ठिकाणी गेले आणि त्यांना रडू आले , अश्रु आनंदाचे होते रात्र होती म्हणून पक्षी नव्हते रामशंकर टिकीट आरक्षित करण्यास निघाले तेव्हा शेजारील पक्याने आवाज दिला रामकाका मननचा फोन आहे , मनन म्हणाला आता तुम्हाला इथे येण्याची गरज नाही कारण स्वतः अनिल कुबंळे त्याचे पालक म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत !!!

कोणास ठाऊक कोणत्या जन्माचे ऋणानुबंध असतील नाहीतर कुठे बंगलोरचे अनिल कुंबळे आणि कुठे अहमदाबादचा मनन रामशंकर ठाकर घडले असे की काॅलेज सुरू झाल्या नंतर मननला त्या देवदुताला (अनिल कुंबळे) भेटण्याची उत्कट इच्छा झाली फोन करुन मुलाखतीची वेळ घेऊन मनन पोहचला त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळेच वर्तन त्याला अनुभवात आले एवढा महान खेळाडू इतका नम्र आणि विनयशील असेल अशी कल्पनासुद्धा नव्हती अनिलने त्याची पूर्ण कहाणी एकून त्याला आश्वासन दिले की त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत सर्व खर्च तो करील चिंता करू नकोस पेरेंट डेची ही गोष्ट मननने सांगितली. अनिलने आपली डायरी बघून त्याचे पालक म्हणून उपस्थित राहण्याचे आश्वासन सुध्दा दिले मनन अति खुश ही खुशी त्याला जिरवणे शक्य झाले नाही त्याने ही गोष्ट प्रिन्सिपॉलना सांगून टाकली बस काॅलेजमध्ये ही गोष्ट व्हायरससारखी पसरली मननचा मान वाढला मनन पण जबाबदारीने मेहनत करू लागला कोणी त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे चीज करायचे होते.

झाले तसेच त्याने फायनलमध्ये Distinction सहीत यश मिळवले अहमदाबादला परत जाण्याची वेळ आली त्या आधी मनन अनिल आणि त्याच्या मातोश्रीना भेटण्यास गेला आभार व्यक्त करण्यास शब्द नव्हते ते काम अश्रुंनी केले अनिल आणि मातोश्रीपण सद्गदित झाल्या Bravo Anil Kumble
जीवनात श्रीमंतीचा अभिमान सोडून जास्त नाही पण आपल्या जवळच्या हितचिंतकाचे भले करण्यात खर्च करा लग्नप्रसंगी दिखावा करण्यात लाखो खर्च करण्यापेक्षा चांगल्या कार्यात त्याचा उपयोग करणे हीच खरी श्रीमंती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!