ताज्या घडामोडी

शिवानी पाटील लेफ्टनंट पदी देशात तिसरी.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – पाडळेवाडी (ता.शिराळा) येथील शिवानी शंकरराव पाटील ही शॉर्ट सर्व्हिस कमिशन या परिक्षेत लेफ्टनंट पदी देशात तिसरी आली.
शिवानी चे शिक्षण बी. ई. मॅकेनिकल झाले आहे. ती मुळची पाडळेवाडी (ता.शिराळा) ची असून तीचे शिक्षण मुंबईत झाले आहे. तिचे वडिल शंकरराव शामराव पाटील हे मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय विभागात नोकरीस आहेत.
या परिक्षेत देशातून सात हजार पात्र विद्यार्थी बसले होते. इंजिनियरिंग बेसमधील आँल इंडिया कट आँफ पध्दतीवर आधारित ही परिक्षा घेण्यात आली. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड परिक्षा ही सलग पाच दिवस चालली असून या मध्ये गुणवत्ता, मनोबल, गुरू आणि ग्राउंड टेस्टिंग व वैयक्तिक मुलाखत असे स्वरूप होते.
शिवानी ही भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रतापराव पाटील रा. शिराळा यांची भाची आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!