ताज्या घडामोडीदेश विदेश

अंगणवाड्या व शाळांमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव ; केंद्राची राज्यसभेत माहिती

Spread the love

नवी दिल्ली : देशातील 38 हजार शाळा आणि पावणेतीन लाख अंगणवाड्यांमध्ये कार्यरत स्वच्छतागृहांचा अभाव असल्याची माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत राष्ट्रवादी खासदार वंदना चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

जलशक्ती मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी देशात स्वच्छतागृह नसलेल्या 2 लाख 86 हजार 310 अंगणवाड्या असल्याचे सांगितले. यातील सर्वाधिक म्हणजे 53 हजार 496 अंगणवाड्या महाराष्ट्रात आहेत. त्या पाठोपाठ ओडीसा, राजस्थान, आसाम, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक,उत्तर प्रदेश यांचा क्रमांक लागतो असे ते म्हणाले.जल जीवन मिशन अंतर्गत 2 ऑक्टोबर 2020 पासून अंगणवाडी व निवासी शाळा तसेच आदिवासी भागातील शाळांना स्वच्छतेसाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे अशी माहिती पटेल यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!